स्पेशल

शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती, बनला लखपती

Published by
Ajay Patil

Farmer Success Story : शेतीमध्ये कालानुरूप, हवामानाच्या अनुसार बदल घडवणे अति आवश्यक आहे. असाच काहीसा बदल पाहिला मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात. दिंडोरी तालुका खरं पाहता द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो.

मात्र द्राक्ष शेतीला निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसत असल्याने अलीकडे द्राक्ष शेतीसाठी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब दिंडोरी तालुक्यात पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने तालुक्यात ड्रॅगन फ्रुट शेतीचा देखील प्रयोग झाला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता या पुढचं पाऊल टाकलं असून औषधी वनस्पतींच्या शेतीत आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. आक्राळे शिवारातील राहुल दौलत निकम नामक एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीत काहीतरी जरा हटके प्रयोग आणि शाश्वत उत्पन्न मिळेल म्हणून जिरेनियम या औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.

या पठ्ठ्याने तालुक्यात केलेला हा प्रयोग पहिलाच असून आपल्या एक एकर शेत जमिनीत फुलवलेला जिरेनियमचा मळा आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिरेनियम ही एक औषधी वनस्पती असून या औषधी वनस्पतीच्या पानांचे तेल काढून बाजारात विकले जाते. याशिवाय जिरेनियमची रोपे तयार करून देखील विक्री काही शेतकरी करत असतात.

कदम यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 3 फूट बाय 1.5 फूट अंतरावर जिरेनियम लागवड केली. या अंतरावर लागवड केल्यास एका एकरात दहा हजार रोपांची लागवड होते. जिरेनियमचे एक रोप सहा रुपयेला मिळते. म्हणजेच एकरी 60 हजार रुपये फक्त रोपांसाठी खर्च होतात. तसेच लागवडीनंतर तीन ते चार महिन्यात यापासून उत्पादन मिळते.

लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी रोपेही अंदाजे अडीच ते तीन फूट वाढतात आणि त्यानंतर ती कापणीसाठी योग्य बनतात. एका एकरात जीरेनियमच्या शेतीतून सहा ते सात टन असा जिरेनियमचा पाला उपलब्ध होतो. यातूनच सहा किलो पर्यंत जिरेनियमचे सुगंधी औषधी तेल उपलब्ध होतं.

विशेष म्हणजे एकदा लागवड केली की सलग चार वर्षे उत्पादन मिळत राहतं. आम्ही आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की जिरेनियम या औषधी वनस्पती पासून एकरी दहा ते पंधरा किलो तेल मिळत. जिरेनियमच्या तेलाला 12 ते 15 हजार रुपये प्रति किलो असा दर मिळतो.

सरासरी 13000 रुपये प्रति किलो असा दर जरी पकडला तरी देखील जिरेनियमच्या शेतीतून एकरी दीड ते दोन लाखांच उत्पन्न मिळणं सहज शक्य आहे. राहुल दौलत निकम या प्रयोगशील शेतकऱ्याने देखील जिरेनियमच्या शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. निश्चितच राहुल प्रमाणे जर शेतीमध्ये बदल केला तर शेतकऱ्यांना लाखोंची कमाई करता येणे सहज शक्य होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil