स्पेशल

मराठमोळ्या शेतकऱ्याचा शेतीमधला चमत्कार ! 8 एकर संत्रा बागेतून 35 लाखांची केली कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

Published by
Ajay Patil

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिशय नगण्य अस उत्पन्न मिळत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान यामुळे पारंपारिक पिकांच नुकसान होत आहे. या अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत बळीराजा बहु कष्टाने अधिकचा उत्पादन खर्च करून पीक उत्पादित करतो मात्र शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नाही.

शासनाची कुचकामी धोरणे, उद्योगाची लॉबीने शासनावर आणलेला दबाव यामुळे शेतकऱ्यांची कायमच कोंडी होते. सध्या स्थितीला तर बाजारात सोयाबीन कापूस आणि कांदा या तीनही शेतमालाला बाजारात अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.

त्यामुळे पारंपारिक पिकांच्या शेतीत शेतकऱ्यांना कायमच तोटा सहन करावा लागला आहे.

मात्र असे असले तरी काही शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये नवीन मार्ग चोखंदळ होते लाखोची कमाई करून दाखवली आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या आठ एकर संत्रा फळबागेतून तब्बल 35 लाखांची कमाई करत शेती हा फक्त तोट्याचाच व्यवसाय आहे अशा म्हणणाऱ्या अनेकांना आरसा दाखवण्याचं काम केलं आहे.

जिल्ह्यातील मौजे भूर येथील गोपाल देवळे नामक प्रयोगशील शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. गोपाल यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेत जमीन आहे. पारंपारिक पिकांच्या लागवडित कायमच नुकसान सहन करावे लागले असल्याने त्यांनी आपल्या संपूर्ण आठ एकर शेत जमिनीवर संत्रा या फळ पिकाची लागवड केली आहे. गेल्या वर्षी गोपाळ यांना या आठ एकर बागेतून 3200 कॅरेट संत्र्याचे उत्पादन झाले होते.

त्यावेळी त्यांना चार लाख वीस हजाराचा खर्च याला आला होता. एवढा खर्च करून त्यांना 26 लाखाहून अधिकची कमाई झाली होती. खर्च व जाता 22 लाख निव्वळं नफा त्यांना त्यावेळी राहिला. यंदा या संत्रा बागेतून उत्पादन अधिक मिळणार आहे. त्यांना जवळपास 5000 कॅरेट संत्राचे उत्पादन यंदा होईल अशी आशा आहे. अशा परिस्थितीत 35 लाखापेक्षा अधिकची कमाई त्यांना यावर्षी होईल असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 3500 कॅरेट संत्राची तोडणी झाली आहे.

700 रुपये प्रति कॅरेट असा दर मिळत आहे. सध्या फळ तोडणे सुरू असून आत्तापर्यंत 22 लाखांची कमाई झाली आहे. निश्चितच, असाच बाजार भाव राहिला आणि हवामानात मोठा बदल झाला नाही तर त्यांना जवळपास 35 लाख रुपयांची यावर्षी कमाई होण्याची दाट शक्यता आहे. निश्चितच गोपाळ यांनी केलेला हा प्रयोग इतरांसाठी आदर्शवत राहणार आहे.

गोपाळ यांच्या मते, त्यांनी संत्रा बागेतून यशस्वी उत्पादन घेण्यासाठी त्यांनी संतुलित प्रमाणात खताचा वापर केला, फवारणी, छाटणी, पाणी व्यवस्थापन यांसारख्या छोट्या छोट्या बाबींवर लक्ष घातलं. निश्चितच शेतकरी बांधवांनी देखील शेती पिकाच्या नियोजनाच्या बाबी काटेकोरपणे पाळल्या वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले तर शेतीतून त्यांना देखील चांगली कमाई करता येणे शक्य आहे.

Ajay Patil