Farmer Success Story : काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि योग्य नियोजन आखलं तर कमी पाणी असलेल्या भागातही लाखोंची कमाई सहजरित्या केली जाऊ शकते. कोकणातील एका शेतकऱ्याने देखील असंच काहीच करून दाखवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्याच्या सुकुंडी बोरथळ येथील अलकेश कांबळे नामक प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र अडीच महिन्यात दोन एकरातून सहा लाखांची कमाई कलिंगड शेतीतून करून दाखवली आहे. तसं पाहता कोकण म्हटल्यानंतर मुबलक पाणी असा आपला समज असतो.
मात्र येथीलही काही भागात पुरेशी अशी पाण्याची व्यवस्था नसते. कोकणात ज्या ठिकाणी पाणी नसते अशा जमिनीला वरकस नावाने संबोधतात. अकलेश यांची देखील अशीच वरकस जमीन होती. मात्र, पाणी नसले म्हणून काय झालं लाखो रुपयांची कमाई करण्याची इच्छाशक्ती मात्र त्यांच्यात होती. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत ऑक्टोबर महिन्यात कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने त्यांनी सिजेंटा म्हणजे अगस्ता या जातीच्या कलिंगडाची लागवड केली. कलिंगड लागवडीमध्ये मल्चिंग पेपर तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा वापर त्यांनी केला. या पिकासाठी लागवड ते जोपासणीसाठीचा एक लाख रुपयाचा खर्च त्यांना आला आहे. म्हणजे या पिकातून त्याला मात्र 80 दिवसात पाच लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.
विशेष म्हणजे जर वातावरण अजून चांगले राहिले असते तर उत्पादनात मोठी वाढ झाली असती परिणामी नफ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता होती. कलिंगड पिकातून मात्रा 80 दिवसात उत्पादन मिळाले असून एका टनाला वीस हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे.
म्हणजेच किलोला वीस रुपयाचा दर मिळाला. कलिंगडचे त्यांना दोन एकरातून जवळपास 30 टन पर्यंत उत्पादन मिळाले आहे.विशेष म्हणजे अकलेश केवळ कलिंगड पिकाची लागवड करतात असे नाही तर ते इतर भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. अकलेशने सांगितल्याप्रमाणे दरवर्षी ते आपल्या ५ एकर क्षेत्रात ८ महिने मेहनत करून जवळपास १५ ते १८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
निश्चितच या युवा शेतकऱ्याचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. पारंपारिक पीक पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा हंगामी पिकांची शेती केली तर निश्चित शेतकऱ्यांना लाखोंची कमाई सहजतेने होणार आहे.