Avesh Khan Struggle Story : वडील विकायचे पान… आता मुलगा खेळणार देशासाठी क्रिकेट, जाणून घ्या खडतर प्रवासांनी भरलेली क्रिकेटर आवेश खानची संघर्षमय कहाणी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avesh Khan Struggle Story : भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक क्रिकेटर हे कठीण संघर्षातून आले आहेत. त्यांचा गल्लीतील क्रिकेटपासून ते देशासाठी क्रिकेट खेळण्यामागे एक खूप मोठी संघर्षाची कहाणी लपलेली असते. मात्र अनेकांना त्यांच्या या संघर्षाबद्दल माहिती नसते.

तसेच तुम्ही अनेक क्रिकेटर्सच्या महागड्या कार, बाईक्स आणि त्यांच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल ऐकले असेल. तसेच अनेकांना क्रिकेटर्सच्या लक्झरी जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यात रस असतो. मात्र तुम्हाला अशा एका क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत ज्याने भारतीय संघात क्रिकेट खेळण्यासाठी किती संघर्ष केला आहे.

भारतीय क्रिकेट संघामध्ये आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार क्रिकेटर आवेश खान खेळणार आहे. आशियाई क्रीडा 2023 स्पर्धा ही २३ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये आवेश खानचे देखील नाव आहे. ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करणार आहे.

चला तर जाणून घेऊया आवेश खानचा खडतर आणि प्रेणदायी प्रवास

आवेश खानचा जन्म मध्यप्रदेश मधील इंदौर या ठिकाणी 13 डिसेंबर 1996 रोजी झाला आहे. आवेश खान याने भारतीय क्रिकेट संघामध्ये २०२२ मध्ये पदार्पण केले आहे. आवेश खान हा उजव्या हाताने उत्कृष्ट गोलंदाजी करणारा खेळाडू आहे.

आवेश खान याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्याने तो चर्चेत आला. सर्वात प्रथम त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघासोबत पदार्पण केले. तेव्हापासून तो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला.

आवेश खानचा इथपर्यंतचा प्रवास खडतर आहे. तो मध्यप्रदेशमधील इंदोर या ठिकाणचा एका माध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे क्रिकेटर बनण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

आवेश खानचे वडील इंदूरमध्ये पान विकायचे

आवेश खान याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने कुटूंबाचा उदर्निर्वाह करण्यासाठी त्याचे वडील एक छोटेसे पानाचे दुकान चालवायचे. त्यांच्या या कमाईतून घर चालत होते. त्यांची रोजची कमाई ५०० रुपये होती.

मात्र अचानक एके दिवशी सरकारकडून त्याच्या वडिलांचे पानाचे दुकान काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुटुंबाचा पैसे येण्याचा मार्ग देखील बंद झाला. तेव्हापासून आवेश खान याने जोरदार सर्व करून चांगला क्रिकेटर बनण्याची जिद्द पकडली.

U19 ने आवेश खानचे आयुष्य बदलले

भारताच्या U19 संघात निवड झाल्यानंतर आवेश खानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख होती आणि लवकरच त्याची आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी निवड झाली. त्यानंतर त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 10 कोटी रुपयांना विकत घेतले.

त्याच्या चमकदार आयपीएल कामगिरीनंतरही, हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांनी आवेश खानकडे दुर्लक्ष केले आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यात त्याच्या प्रतिभेला बाजूला केले. पण पुन्हा एकदा त्याला अजित आगरकरने टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली आहे.