FD News : एफडीमध्ये, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत आणि ते निश्चित कालावधीसाठी निश्चित दराने परताव्याची हमी देतात. एफडीमध्ये ठेवलेल्या पैशांवर चढ-उतारांचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून जर आपल्याला 3 वर्षांच्या एफडीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आपल्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
आजकाल, बर्याच बँका 3 वर्षांच्या एफडीवर वर्षाकाठी 9.5 टक्के दराने परतावा देत आहेत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण देशात अशा काही बँका आहेत ज्या की एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.
दरम्यान आज आम्ही येथे अशा काही बँकांची यादी देणार आहोत जे की 3 वर्षांच्या एफडीवर चांगले व्याजदर देत आहेत.
या बँका देतात सर्वाधिक व्याज
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्ष कालावधीच्या फिक्स डिपॉझिट वर नऊ टक्के दराने परतावा देते.
तसेच याच कालावधीच्या फिक्स डिपॉझिट मध्ये जर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांनी जर गुंतवणूक केली तर त्यांना 9.50% दराने परतावा देते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही स्मॉल फायनान्स बँक आपल्या सिनिअर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत अधिकचे व्याज देते.
सध्या स्थितीला ही स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षे कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 8.60 टक्के दराने परतावा देत आहे तसेच ही बँक सीनियर सिटीजन ग्राहकांना 9.10% दराने परतावा देत आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगला परतावा देताना दिसते.
ही बँक सामान्य ग्राहकांना तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर 8.50 टक्के दराने परतावा देत आहे आणि सीनियर सिटीजन ग्राहकांना तीन वर्षे कालावधीच्या एफडीवर 9.10% दराने परतावा देते.