FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘ही’ बँक एफडीवर देणार 9.10% पर्यंतचे व्याज

Published on -

FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करणाऱ्या एका बँकेची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला.

आरबीआयने तब्बल दोन वर्षानंतर रेपो रेट मध्ये बदल केलाय. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25% पर्यंत खाली आणले आहेत आणि याचा परिणाम म्हणून आता विविध प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत.

त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त केली जात असली तरी देखील या निर्णयाचा काही लोकांना फटका सुद्धा बसणार आहे. कारण की, आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली असल्याने आता फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात सुद्धा कपात होणे स्वाभाविक आहे.

मात्र, अशी ही परिस्थिती असतानाच नुकतीच एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे देशातील एका बँकेने अलीकडेच आपले फिक्स डिपॉझिटवरील व्याजदर रिवाईज केले आहेत आणि महत्त्वाची बाब अशी की या रिविजन मध्ये बँकेने एफडी वरील व्याजदरात कोणत्याच प्रकारची कपात केलेली नाही, याउलट बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात होणे स्वाभाविक होते मात्र बँकेने असे काही केले नाही.

अशा वेळी जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील रेपो रेट कपातीनंतर गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) दर कमी होण्याबद्दल चिंता आहे, अशा परिस्थितीतच शिवालीक स्मॉल फायनान्स बँकेने एफडी व्याज दर सुधारित केले आहेत. शिवालीक स्मॉल फायनान्स बँकेने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना 9.10 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.

या कालावधीचे एफ डी वर मिळणार सर्वाधिक व्याज

बँकेच्या विविध कालावधीच्या एफडीवर ग्राहकांना वेगवेगळे व्याजदर ऑफर केले जात आहेत. बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधी पर्यंत एफडी योजना ऑफर केली जात असून यावर गुंतवणूकदारांना किमान चार टक्के दराने आणि कमाल 9.10% दराने परतावा मिळत आहे.

बारा महिना एक दिवस ते 18 महिने कालावधीच्या एफडीवर या बँकेकडून सामान्य ग्राहकांना 9.05% दराने परतावा दिला जात असून याच कालावधीच्या एफडीवर गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा ग्राहकांना बँकेकडून 9.10% दराने परतावा दिला जात असून ही बँकेची सर्वाधिक व्याज देणारी एफडी योजना देखील बनली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe