FD News : सध्या देशात दीपोत्सवाचा सण साजरा होत आहे. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या आधीच सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या लोकांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी खास ठरणार आहे.
कारण की देशातील एका प्रमुख बँकेने फिक्स डिपॉझिट चे व्याजदर सुधारित केले आहेत. खरेतर, दरवर्षी सणासुदीच्या काळात देशातील विविध बँका एफडी चे व्याजदर बदलत असतात.
यंदाही देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर बदलले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब आणि सिंध बँकेनेही व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने अल्पकालावधीच्या FD योजनेच्या व्याजदरात सुधारणा करण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.
या सरकारी बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची FD योजना ऑफर केली जात आहे. बँकेकडून विविध कालावधीच्या एफडींवर सामान्य नागरिकांना 4% ते 7.50% पर्यंतचे व्याज दिले जात आहे.
तसेच, 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना या बँकेकडून 0.50% अतिरिक्त व्याज दिले जात आहे. तसेच सुपर ज्येष्ठ नागरीकांना काही कार्यकाळांवरील FD वर 0.15% अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
कोणत्या कालावधीच्या एफडीवर मिळते सर्वाधिक व्याज?
देशातील प्रमुख सरकारी बँक अर्थातच पंजाब आणि सिंध बँक ५५५ दिवसांच्या नॉन-कॉलेबल एफडीवर सर्वाधिक परतावा देत आहे. या कालावधीच्या एफडीवर बँकेकडून सामान्य नागरिकांना 7.50% परतावा मिळत आहे.
तसेच, या कालावधीच्या कॉलेबल FD वर 7.45% दराने व्याज मिळत आहे. त्याच वेळी, बँक 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सुद्धा चांगला आकर्षक परतावा देत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना १५१ दिवसांपासून १७९ दिवसांच्या एफडीवर ६ टक्के परतावा मिळत आहे. तसेच, बँक एका वर्षाच्या कालावधीवर 6.30% व्याज देत आहे.
यामुळे जर तुम्हालाही येत्या काही दिवसात बँकेच्या फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर पंजाब आणि सिंध बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.