FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
फिक्स डिपॉझिट मध्ये केलेली गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते. येथे महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात.
महत्त्वाचे म्हणजे बँकांच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एफडीवर अधिकचे व्याजदर दिले जाते. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी काही विशेष एफडी योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत.
आयडीबीआय बँकेने देखील सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी एक विशेष एफडी योजना सुरू केली आहे. दरम्यान आज आपण आयडीबीआय बँकेने नुकतीच लॉन्च केलेली एक विशेष एफ डी योजनेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आयडीबीआय बँकेने सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी एक अद्भुत योजना सुरू केली आहे. यामध्ये, त्यांना सुरक्षित गुंतवणूकीसह 8.05 टक्क्यांपर्यंतच्या मजबूत परताव्याचा फायदा देखील मिळतो. आयडीबीआय बँकेने नुकतीच चिरंजीवी सुपर सीनियर सिटीजन स्कीम लॉन्च केली आहे.
यात सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना म्हणजेच 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या लोकांना गुंतवणूक करता येते. यात फक्त 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांनाच गुंतवणूक करता येते. सामान्य ग्राहकांना यामध्ये गुंतवणूक करता येत नाही.
60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना देखील यात गुंतवणूक करता येत नाही. यात फक्त 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिकचं गुंतवणूक करू शकतात. दरम्यान आज आपण या चिरंजीवी एफडी योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
या योजनेअंतर्गत 375 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.90% दराने परतावा दिला जात आहे. 444 दिवसांच्या FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना आठ टक्के दराने व्याज दिले जाते.
555 दिवसांच्या एफडी योजनेत सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 8.05 टक्के दराने व्याज दिले जाते. 700 दिवसांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.85% दराने व्याज दिले जात आहे.