स्पेशल

1 फेब्रुवारी 2025 पासून ‘हे’ 5 नियम चेंज होणार ! LPG गॅसच्या किंमती बदलतील, इंधनांच्या किमतींवरही परिणाम होणार ? पहा….

Published by
Tejas B Shelar

February 2025 Rule Change : आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून 2025 या नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच काही नियमांमध्ये बदल होणार अशी शक्यता असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. खरंतर फेब्रुवारी हा महिना सर्वसामान्यांसाठी फारच खास ठरणार आहे. कारण की एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प राहणार असल्याने या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जातील अशी शक्यता आहे. तसेच 1 फेब्रुवारी 2025 पासून काही नियम सुद्धा बदलणार आहेत. दरम्यान आता आपण या नव्या महिन्यात कोणते नियम चेंज होणार, याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार याचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या महाग होणार : भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकी फेब्रुवारी महिन्यात ग्राहकांना दणका देणार आहे. या कंपनीच्या कार पुढील महिन्यापासून महाग होणार आहेत. मारुती सुझुकी ही एक दिकाच्या ऑटो कंपनी आहे.

ही भारतातील सर्वात मोठी ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते पण या कंपनीच्या माध्यमातून एक फेब्रुवारी 2025 पासून ऑपरेटिंग कॉस्ट आणि इनपुट कॉस्टची भरपाई म्हणून काही ठराविक मॉडेल्सच्या किंमतीत 32,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.

यामुळे ग्राहकांना मारुती सुझुकीची नवीन कार घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ऑल्टो के 10, सेलेरिओ, एस प्रेसो, स्विफ्ट, ब्रेझा, अर्टिगा, डिझायर, बलेनो, सियाज, एक्सएल 6, जिम्नी आणि ग्रँड व्हीटारा या कारच्या किमती वाढवणार आहे.

काही बँकांचे नियम बदलणार : एक फेब्रुवारी 2025 पासून काही बँकांचे नियम चेंज होणार आहेत. कोटक महिंद्रा बँकेनं सामान्य शुल्कांमध्ये त्याचबरोबर सुविधेमध्ये बदल होणार अशी माहिती नुकतीच दिली आहे. अनेक बँकांच्या एटीएमच्या सुविधेमध्ये देखील बदल होणार आहेत. म्हणून बँका नेमका काय बदल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एलपीजी गॅसच्या किमती बदलतील : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन कंपन्यांच्या माध्यमातून एलपीजी गॅसचे दर सुधारित केले जात असतात. 14 किलो वजनीच्या घरगुती गॅस च्या किमती आणि 19 किलो वजनीच्या कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस च्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. यानुसार 1 फेब्रुवारी 2025 पासूनही एलपीजी गॅस च्या किमतीत बदल पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमती स्थिर आहेत म्हणून पुढील महिन्यात यात काही बदल होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस च्या किमती सातत्याने बदलत आहेत. यामुळे पुढल्या महिन्यात कमर्शियल गॅस च्या किमती वाढतात की कमी होतात की कायम राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यूपीआयचे नियम सुद्धा बदलतील : फेब्रुवारी महिन्यापासून यूपीआयचे नियम देखील बदलणार आहेत. स्पेशल कॅरेक्टरनुसार जो व्यक्ती UPI व्यवहार करेल त्याच्या आयडीवरून कोणत्याच प्रकारचा व्यवहार होणार नाही. फक्त अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर्स वापरणाऱ्या व्यक्तींनाच UPI व्यवहार करता येणार आहेत. हा नवा बदल देखील 1 फेब्रुवारी 2025 पासून पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

ATF च्या दरात बदल होणार : एअर टरबाइन फ्युलच्या दरात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदल होतो यानुसार फेब्रुवारी मध्येही हा बदल होणार आहे. यामुळे आता 1 फेब्रुवारी 2025 ला एअर टर्बाइन फ्युल च्या किमतीत काय बदल होतो हे पाहणे उत्सुकतेचे राहील. याच्या किमती वाढल्यात तर हवाई वाहतूक महाग होणार आहे. विमान प्रवाशांचा प्रवास यामुळे महागणार आहे आणि उद्योगांवर देखील याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com