First Airport Of India : भारताची दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत आता फारच मजबूत झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्या रेल्वे आणि विमान वाहतूक मजबूत करण्याकडे सरकारचे विशेष लक्ष राहिले आहे. जगातील विकसित देशात जशा प्रवासाच्या सुविधा आहेत तशाच सुविधा आता आपल्या भारतात सुद्धा तयार झाले आहेत आणि यामुळे नागरिकांना साहजिकच मोठा दिलासा मिळतोय.
खरे तर कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते आणि याच अनुषंगाने सरकारकडून दळणवळण व्यवस्था मजबूत बनवण्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. यासाठी संपूर्ण देशभर रस्त्यांचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत आणि रेल्वेचे देखील अनेक मोठे मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत.

नवनवीन ठिकाणी रेल्वे लाईन टाकल्या जात आहेत, नवीन रेल्वे स्थानक तयार होत आहेत. वंदे भारत ट्रेन सारख्या हाय स्पीड रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही महिन्यांनी भारतात बुलेट ट्रेन सुद्धा धावताना दिसणार आहे.
रस्त्यांचा विचार केला असता मोठ्या महामार्ग तयार केले जात आहेत. रिंग रोड, फ्लाय ओव्हर, कॉस्टल रोड, बोगदे अशा अनेक प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत. विमान वाहतुकीत वेगवेगळी शहरे विमान वाहतुकीने जोडले जात आहेत.
नवनव्या शहरात विमानतळ तयार केली जात आहेत. पण, भारतातील पहिल विमानतळ कुठं तयार झालं होत? याबाबत तुम्हाला काही ठाऊक आहे का? नाही ना मग आज आपण भारतातील पहिल्या विमानतळाची गोष्ट पाहणार आहोत.
खरे तर भारतातील पहिले विमानतळ आपल्या महाराष्ट्रात तयार झालं. सध्या भारतात बस अन रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी देखील विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील काही कमी नाही.
भारतातील अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि डोमेस्टिक विमानतळांची संख्या देखील आपल्या देशात फार अधिक आहे. राज्यातही अनेक आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळ आहेत. देशातील पहिल विमानतळ सुद्धा आपल्या राज्यात तयार झाल होत.
या शहरात तयार झालं होतं पहिलं विमानतळ
भारतातील पहिल विमानतळ हे महाराष्ट्रातील मुंबई शहरात तयार करण्यात आलं होतं. महत्त्वाचे म्हणजे देशातील हे पहिले विमानतळ आजही सुरू आहे. देशात कमर्शियल फ्लाइट्सची सुरुवात JRD टाटा यांनी केली होती, त्यांनी देशातील पहिलं नागरिक उड्ड्यान जुहू एयरोड्रोम विमानतळाची स्थापना केली, या विमानतळाची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली.
पुढे 1932 मध्ये जेआरडी टाटा इथे पहिल विमान उतरवण्यात आलं होतं. ही देशातील पहिली अनुसूचित कमर्शियल मेल सर्व्हिस होती. ही पहिली विमान सेवा कराची ते मुंबई दरम्यान चालवली गेली. या विमानतळाबाबत बोलायचं झालं तर सध्या इथे 2 रनवे ऑपरेशनल आहेत.
या विमानतळावर सध्या अनेक मोठे नेते अन मंत्र्यांसह इतर व्हीआयपींची विमाने उतरवली जात आहेत. यासोबतच इथून हेलिकॉप्टर सुद्धा उड्डाण भरतात. इथं बॉम्बे फ्लाइंग क्लब पायटलला प्रशिक्षण सुद्धा दिल जात आहे, अन हे विमानतळ दिल्लीच्या पालम विमानतळासारखेच काम करतं आहे.