Flex Fuel Information : अलीकडे देशात प्रदूषण नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. शिवाय इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी, पेट्रोल डिझेल यांची आयात कमी करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पारंपारिक इंधन स्रोताला पर्याय म्हणून बायोडिझेल, फ्लेक्स फ्युल वापरण्याबाबत देशात ट्रायल सुरू आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी फ्लेक्स फ्युल वर धावणारी वाहने तयार करण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे काही वाहने रस्त्यावर धावू देखील लागली आहेत. मात्र अजूनही देशात फ्लेक्स फ्युल हा प्रकार अगदी पहिल्या स्टेजवर आहे. मात्र सध्या संपूर्ण देशभरात फ्लेक्स इंजिन, फ्लेक्स फ्युल, बायो इथेनॉल यांसारखी शब्द रोजाना कानावर पडत आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण फ्लेक्स इंजिन म्हणजे काय, फ्लेक्स फ्युल म्हणजे काय? तसेच विना फ्लेक्स इंजन असलेल्या वाहनात फ्लेक्स इंधन वापरलं जाऊ शकतं का? याविषयी डिटेल पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फ्लेक्स फ्युल नेमकी आहे तरी काय भानगड?
फ्लेक्स फ्युल म्हणजे काय हा प्रश्न देशातील अनेकांना पडला आहे. कारण की हा शब्द आता रोजाना टीव्ही, वृत्तपत्र यामध्ये वाचायला, ऐकायला, पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी आपल्या जवळपास सर्वच कार्यक्रमात या शब्दाचा वारंवार उल्लेख करतात. तसेच शेतकरी हा बायो इथेनॉल उत्पादित करून ऊर्जादाता बनेल असं वारंवार नमूद करत असतात.
अशा परिस्थितीत आज आपण फ्लेक्स फुल कसे बनते हे थोडक्यात जाणून घेऊया. खरं पाहता, फ्लेक्स इंधन म्हणजे असं इंधन ज्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल सोबतच अजून एका इंधनाची भर घातलेली असते. थोडक्यात पेट्रोल आणि डिझेल सोबत एक इंधन मिक्स केलं जात जे की कमी कार्बन उत्सर्जित असतं आणि या मिश्रणाला फ्लेक्स फ्युल म्हणतात. आता पेट्रोल आणि डिझेलमध्ये नेमकं असं काय मिक्स केलं जातं तर यामध्ये बायो इथेनॉल किंवा मिथेनॉल मिक्स केलं जातं.
आता बायोथेनॉल मिळतं कसं तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बायो इथेनॉल हे उसाच्या चिपाडापासून तयार होत. उसापासून रस काढून जो चोथा शेष राहंतो त्यावर प्रक्रिया करून हे इथेनॉल तयार होत असतं. उसाच्या चोथ्यावर प्रक्रिया करताना सर्वप्रथम फर्मेंटेशन केलं जात या प्रक्रियेत एक इंधन तयार होतं इंधनाला पुढे प्युरिफिकेशनसाठी पाठवलं जातं.
मग इंधन प्युरिफाय झाल्यानंतर इथेनॉल म्हणून वापरण्यास तयार होतं. मग फ्लेक्स फ्युल तयार करण्यासाठी हे ऊसाच्या चिपाडापासून तयार झालेलं इथेनॉल मग पेट्रोल किंवा डिझेलमध्ये एका ठराविक प्रमाणात ब्लेंड केलं जातं किंवा मिक्स केल जात. अशा पद्धतीने मग फ्लेक्स फ्युल तयार होतं.
आता फ्लेक्स फुल कोणत्या वाहनात वापरलं जाऊ शकतं?
फ्लेक्स इंधन वापरल्या जाणाऱ्या गाड्या तूर्तास भारतीय रस्त्यांवर चमकत नाहीत. खरं पाहता यावर आपल्या देशात केवळ पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. विशेष म्हणजे या पायलेट प्रोजेक्टमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर लवकरच भारतीय रस्त्यांवर देखील फ्लेक्स इंधनयुक्त गाड्या धावणार असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या पायलेट प्रोजेक्टमध्ये काही गाड्या अशा आहेत ज्या ऑलरेडी इतर देशात फ्लेक्स इंधनावर चालू आहेत. यामुळे निश्चितच हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी होण्याचा दावा ठोकला जात आहे.
फ्लेक्स इंधन वापरण्याचे फायदे थोडक्यात
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फ्लेक्स इंधन वापरल्याने इंधनावरील खर्च वाचण्यास मदत होणार आहे. म्हणजे हे इंधन प्युर पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्तात उपलब्ध होणार आहे. शिवाय याचा अजून एक बेनिफिट तो म्हणजे यामुळे प्रदूषण देखील खूपच कमी प्रमाणात होणार आहे. खरं पाहता इथेनॉल हे कार्बन उत्सर्जित करत नाही मात्र पेट्रोल आणि डिझेल मोठ्या प्रमाणात कार्बनाचे उत्सर्जन करतात. अशा परिस्थितीत प्युअर पेट्रोल आणि डिझेलने चालणारे इंजिन अधिक प्रमाणात प्रदूषण घडवून आणत असते. यामुळे हा फ्लेक्स इंधन पर्याय पुढे करण्यात आला आहे.
सरकारचा देखील फ्लेक्स इंधन अधिक उपयोगात आणण्याचा मानस असून यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर असणार आपलं दुसऱ्या देशांवरचं अवलंबित्व आणि प्रदूषण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस मॅनेज होण्यास मदत होणार आहे. मात्र तूर्तास या फ्लेक्स इंधनाचा आणि फ्लेक्स इंजिनाचा पायलट प्रोजेक्ट आपल्या देशात सुरू आहे. अजून फ्लेक्स इंजिनवाले वाहने भारतीय रस्त्यांवर धावत नसून फ्लेक्स इंधन देखील भारतीय पेट्रोल पंपावर पूर्णपणे उपलब्ध झालेलं नाही.
ज्या गाडीमध्ये फ्लेक्स इंजिन नाही त्या गाडीमध्ये फ्लेक्स इंधन वापरता येऊ शकत का?
या प्रश्नाचे उत्तर आहे हो. खरं पाहता यावर देखील अजून पायलट प्रोजेक्ट सुरू आहे. नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये एक असं डिवाइस प्रदर्शित करण्यात आला आहे जे साध्या फोर व्हीलर वाहनात सेटअप करून बिना फ्लेक्स इंजिन असलेलं वाहन देखील फ्लेक्स इंजिनवर धावण्यास सक्षम करणार आहे. निश्चितच फ्लेक्स इंजिन नसलेल्या वाहनांमध्ये देखील येत्या काही दिवसात फ्लेक्स इंधन वापरता येणे शक्य होणार आहे. मात्र सध्या स्थितीला यावर स्पष्टपणे सांगता येणे कठीण आहे.
केव्हा मिळेल फ्लेक्स फ्युल
दरम्यान आता अनेकांचा असा प्रश्न आहे की फ्लेक्स इंधन आणि फ्लेक्स इंजिनचे वाहने भारतीय रस्त्यांवर केव्हा धावतील. बाबत सरकार असं म्हणते की 2025 पर्यंत भारतात 20 टक्के इथेनॉल ब्लेंड पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल. म्हणजेच 2025 पर्यंत 20% इथेनॉल असलेले पेट्रोल आणि डिझेल म्हणजे फ्लेक्स फुलं बाजारात उपलब्ध होईल. दरम्यान अनेक तज्ञांनी यावर काही शंका देखील व्यक्त केल्या आहेत. सर्वप्रथम काही तज्ञांनी इथॅनॉलचा वापर पेट्रोल डिझेलमध्ये वाढल्यास शेतकरी एकच वर्णी पीक घेतील यामुळे कृषी क्षेत्राला फायदा होईल की तोटा होईल? जरं एकच पीक घेतलं गेलं तर शेतकऱ्यांचा फायदा कमी आणि तोटा अधिक होऊ शकतो अशी भीती काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
तसेच काही तज्ञांनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी घोडदौड सुरू असतानाच फ्लेक्स इंधनाचा पर्याय कुठे ना कुठे पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही असं सांगितले आहे. निश्चितच यावर वेगवेगळे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे फ्लेक्स फ्युल इंजिन आणि फ्लेक्स फ्युल इंधन भविष्यात कशा पद्धतीने भारतीय बाजारात आपले स्थान निर्माण करते तसेच याचा भविष्यात काय फायदा होतो किंवा काय तोटे होतात या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.