Foreign Trip:-:बऱ्याच व्यक्तींना वेगवेगळ्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा छंद असतो किंवा अशा व्यक्तींना खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची हौस असते. बरेच व्यक्ती भारतातील अनेक निसर्गसौंदर्य स्थळे तसेच धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या तसेच आयआरसीटीसी यांच्या माध्यमातून टूर पॅकेज आयोजित केले जातात.
अशा आकर्षक पॅकेज मध्ये प्रवास भाड्यात सवलत तसेच अनेक प्रकारच्या सोयी सुविधा पर्यटकांना पुरवल्या जातात. अशा पॅकेजचा देखील अनेक पर्यटक लाभ घेत असतात. तुम्हाला जर पर्यटनासाठी कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर नक्कीच यासाठी खर्च हा लागतो व त्यामुळेच आपल्या खिशाचा बजेट पाहून प्रत्येक जण पर्यटनाची किंवा फिरण्याची प्लॅनिंग करत असतो.
अगदी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जरी फिरायचे असेल तरी तुम्हाला तुमचा बजेट पाहूनच त्यासंबंधीचे नियोजन करायला लागते. परंतु भारत सोडून जर तुम्हाला विदेशात पर्यटनासाठी जायची इच्छा असेल तर याकरिता नक्कीच तुम्हाला तुमचा बजेटचा विचार करणे हे क्रमप्राप्त ठरते. कारण त्या ठिकाणी जाण्याचा खर्च व राहण्यापासून ते फिरण्यापर्यंतचा खर्च याचे सगळे नियोजन बसवणे गरजेचे असते व हे आर्थिक नियोजन बसत असेल तरच तुम्ही अशा परदेशामध्ये ट्रिप किंवा फिरण्याची प्लॅनिंग आखू शकतात.
जागतिक पर्यटनामध्ये जर विचार केला तर काही देशांमध्ये पर्यटनाचा किंवा फिरण्याचा खर्च हा खूपच अधिक येतो. परंतु जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत की तेथे जाण्याचा खर्च हा आपल्या बजेटमध्ये असतो. नेमके जगाच्या पाठीवर असे कोणते देश आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये व कमीत कमी खर्चात फिरू शकतात व जागतिक पर्यटनाची इच्छा पूर्ण करू शकतात? याविषयीची माहिती या लेखामध्ये आपण घेणार आहोत.
अगदी कमी खर्चात फिरता येतील तुम्हाला हे देश
1- मलेशिया– स्वस्तामध्ये तुम्हाला जर परदेशात फिरायला जायचे असेल तर तुमच्यासाठी मलेशिया हा पर्याय खूप उत्तम आहे. या ठिकाणी जर तुम्हाला राहायचे असेल तर निवासाचा खर्च हा 600 ते 700 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतो आणि अगदी तीनशे रुपयांमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे जेवण देखील या ठिकाणी करू शकतात. कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही मलेशियाला जाऊन त्या ठिकाणाचे पेट्रोनल टावर, रेडांग बेट आणि कपास बेट यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.
2- मालदीव– मालदीव हे भारतीयांमध्ये खूप प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ असून या ठिकाणचा खर्च देखील खूप कमीत कमी आहे. तुम्हाला जर एखाद्या हॉटेलमध्ये रूम घ्यायची असेल तर पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला या ठिकाणी रूम मिळू शकते. तसेच तुम्हाला जेवणाची ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही अगदी साठ ते 120 रुपयांमध्ये करू शकतात.
3- सेशेल्स– हे ठिकाण भारतापासून जास्त अंतरावर आहे परंतु त्या ठिकाणी असलेल्या सुविधा खूप स्वस्तात उपलब्ध होतात. पूर्व आफ्रिकेमध्ये असलेल्या या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी खोली हजार ते बाराशे रुपयांमध्ये मिळते तसेच तुम्ही पाचशे रुपयांमध्ये उत्तम प्रतीचे जेवण करू शकतात. या ठिकाणी माहे आयलँड, अरीड आयलँड, मरीन नॅशनल पार्क आणि कझिन आयलँड हे ठिकाणे खूप प्रसिद्ध आहेत.
4- फिलिपिन्स– स्वस्त आणि खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये तुम्हाला विदेश फिरायचे असेल तर फिलिपिन्स हे ठिकाण खूप महत्त्वाचे आणि उत्तम पर्याय आहे. साधारणपणे राहण्यासाठी एक खोली तुम्हाला सातशे ते एक हजार रुपयांमध्ये या ठिकाणी मिळू शकते व पाचशे रुपयांमध्ये तुम्ही उत्तम प्रकारचा लंच आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी एस निडो, कार्डिलेरास, नकोस आणि चॉकलेट हिल्स इत्यादी ठिकाणी पाहण्यासारखे आहेत.
5- नेपाळ– भारतीय पर्यटकांकरिता नेपाळ हे आपल्या शेजारील राष्ट्र असून ते खूप स्वस्त आणि फिरण्यासारखे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य तसेच पर्वत व वेगवेगळी तीर्थक्षेत्र खूप महत्त्वाची असून या ठिकाणी पर्यटनाचा समृद्ध अनुभव पर्यटकांना येऊ शकतो. विशेष म्हणजे नेपाळचे चलन हे भारतीय रुपयापेक्षा कमी आहे व या ठिकाणी जायला व्हिसाची आवश्यकता भासत नाही.
6- भूतान– भूतान हा देखील पर्यटनासाठी एक चांगला पर्याय असून या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात जेवण मिळते. 1500 रुपयांमध्ये तुम्ही या ठिकाणी एसी आणि आलिशान खोली बुक करू शकतात व त्या ठिकाणी राहू शकतात. भूतान मध्ये तुम्ही पुनाखा झोंग, हा व्हॅली तसेच थिंपू इत्यादी ठिकाणी पाहू शकता.