स्पेशल

बुलेटला विसरा आणि फ्लिपकार्ट सेलमधून खरेदी करा जावा आणि येझदीच्या बाईक्स! मिळेल 22 हजार 500 रुपयांपर्यंत ऑफर, वाचेल पैसा

Published by
Ajay Patil

दसरा,दिवाळी आणि नवरात्री सारख्या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या ज्याप्रमाणे वाढते अगदी त्याचप्रमाणे वाहन उत्पादक कंपनी आणि फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून देखील वाहन खरेदीवर मोठ्या प्रमाणावर ऑफर्स दिल्या जातात.

सध्या सणासुदीच्या प्रसंगी फ्लिपकार्ट आणि अमेझॉन ॲप्स वर सेल सुरू असून तुम्ही अनेक प्रकारच्या मागण्या वस्तू जरी विकत घेतल्या तरी त्यावर तुम्हाला भरगोस अशा सवलत दिल्या जात आहेत व त्यामुळे बऱ्याच प्रमाणात पैशांची बचत करता येणे शक्य होणार आहे.

इतर काही वस्तूंप्रमाणे तुम्ही आता या शॉपिंग एप्लीकेशन वरून बाईक देखील खरेदी करू शकणार आहात. या माध्यमातून जर तुम्ही बाईक खरेदी केल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे या लेखात आपण जावा आणि येझदी बाईक्स ऑनलाइन खरेदी केल्या तर किती सूट मिळत आहे? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.

जावा आणि येझदी बाईक्सची करा ऑनलाईन खरेदी आणि मिळवा सवलत

तुम्हाला जर या सणासुदीच्या कालावधीमध्ये जर या दोन्ही ब्रँड पैकी कुठलीही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्या ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या बाईक्स फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये सध्या ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

या सेलमध्ये या दोन्ही कंपन्यांच्या सर्व बाईक्स वर 22500 रुपयापर्यंत ऑफर देण्यात आलेली आहे व बँक डिस्काउंट देखील मिळणार आहे. जर आपण भारतात जावाच्या बाईक पाहिल्या तर यामध्ये जावा 42, जावा 42 Fj, जावा पेरक आणि जावा 350 ही चार मॉडेल विकली जातात.येझदीच्या स्क्रंबलर,येझदी रोडस्टर आणि येझदी एडवेंचर येथील मॉडेल्स भारतामध्ये प्रामुख्याने विकले जातात.

 किती मिळत आहे डिस्काउंट?

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2024 सेलमध्ये जावा आणि येझदी कंपनीच्या बाईक्सवर कमीत कमी 12500 रुपयांचे सवलत आणि इतर सवलती देखील मिळणार असून यावर 22500 पर्यंत सूट मिळणे शक्य आहे.

तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना  दहा हजार रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड वर आठ हजार पाचशे रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट आणि एचडीएफसी डेबिट कार्डवर 750 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळत आहे.

 ग्रीन इन्व्हिकटा कंपनी देत आहे इलेक्ट्रिक स्कूटर वर 53% डिस्काउंट

इतकेच नाहीतर तुम्ही जर flipkart ऐवजी ॲमेझॉन सेलच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर ग्रीन इनव्हिक्टा ही कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर तब्बल 53 टक्क्यांचा डिस्काउंट देत असून या स्कूटरची किंमत 95 हजार रुपये आहे.

पण डिस्काउंट नंतर तुम्हाला ती 44 हजार 999 मध्ये विकत घेता येणे शक्य आहे. त्यासोबतच ॲमेझॉन सेलमध्ये ओला S1X स्कूटरवर देखील चांगले ऑफर मिळत असून या स्कूटरची किंमत एक लाख एक हजार 999 रुपये आहे. परंतु ॲमेझॉन सेलमध्ये डिस्काउंट मिळून ही स्कूटर तुम्हाला 94 हजार 999 रुपयांना विकत घेता येणार आहे.

Ajay Patil