चार जबरदस्त Business Ideas ! ५० हजारांत सुरु होतील व लाखो रुपये कमावून देतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Business Ideas : आजच्या काळात वाढत्या गरजा, बदलती लाइफस्टाइल यामुळे खूप पैशांची गरज लागते. त्यामुळे आजकाल केवळ नोकरीवर अनेकांचे घर चालत नाही. त्यामुळे अधिक इन्कम मिळवण्यासाठी लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात.

अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते परंतु भांडवल कमी असते व त्या दृष्टीने बिझनेस आयडिया देखील नसतात. आज आपण याठिकाणी 5 बिझनेस आयडिया पाहणार आहोत ज्या फक्त 50 हजार रुपयांत सुरु होतील. यामुळे तुम्हाला भरपूर उत्पन्न देखील मिळेल.

* फास्ट फूड स्टॉल

फास्ट फूड स्टॉल व्यवसाय हा 50 हजारांत सुरु करता येणार बिझनेस आहे. आजच्या काळात लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. भारतात सध्या फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी तुम्ही स्वत:चा फास्ट फूड स्टॉल बिझनेस सुरू करू शकता.

यात तुम्ही बर्गर, नूडल्स, मोमोज आदी फास्ट फूड विकू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी बर्गर, नूडल्स यांसारखे फास्ट फूड कसे बनवायचे माहित असावे. त्यानंतर बिझनेससाठी अशी जागा निवडा जिथे तुम्हाला तुमचा स्टॉल उभा करता येऊही व ग्राहक जास्त असतील.

आपण जे फास्टफूड विकणार आहोत त्याची एक पाटी तेथे लावा. नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर आपला स्टॉल सुरु करा.

* टिफिन सर्व्हिस

असे आईंक लोक आहेत जे कामानिमित्त घराबाहेर राहात. कुटुंबापासून दूर असल्याने त्यांना घरी बनवलेले अन्न खायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या भागात या लोकांसाठी टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय सुरू करू शकता. यात तुम्हाला घरगुती जेवण तयार करून लोकांना द्यावं लागतं.

केवळ 50,000 रुपयांत तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातून करू शकता. यासाठी आपल्याला घरगुती जेवण सुंदर पद्धतीने तयार करता यायला पाहिजे. याची सुरवात घरातून किंवा एखादे छोटे दुकान भाड्याने घेऊन करू शकता.

जागा निश्चित केल्यानंतर, तुमच्या टिफिन सेवेचे मार्केटिंग सुरू करा, जेणेकरून लोकांना तुमच्या टिफिन सेवेबद्दल माहिती होईल. त्यानंतर आपला व्यवसाय सुरु करा. यात तुम्हाला भरपूर प्रॉफेट मिळेल.

* लोणचे

लोणचे विकण्याचा व्यवसाय भारतात चांगला चालतो. लोणची विक्रीच्या व्यवसायातून अनेक लोक दरमहा हजारो आणि लाखो रुपये कमावत आहेत. त्यामुळे तुम्हीही हा व्यवसाय सुरू करून खूप चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येतो.

सर्वप्रथम लोणचे बनवायला शिकावे लागेल. यानंतर तुम्हाला लोणचे कशापासून बनवायचे आहे हे ठरवायचे आहे.जर तुम्हाला हा व्यवसाय ऑनलाईन करायचा असेल तर सोशल मीडिया मार्केटिंग आणि वेबसाइट मार्केटिंगवर नक्कीच काम करा.

आता लोणचे बनवल्यानंतर तुमच्या सोशल मीडियावर त्याचा प्रचार करा आणि तुमच्या वेबसाइटवर पोस्ट करा जेणेकरून लोक ते ऑनलाइन खरेदी करू शकतील. याशिवाय, जर तुम्हाला हा व्यवसाय ऑफलाइन करायचा असेल, तर तुम्ही छोटे दुकान भाड्याने घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

* हेअर सलून

आजकाल फॅशनचा जमाना आहे. त्यामुळे पुरुष असो किंवा स्त्री ही आपले केस कापतेच. त्यामुळे आपल्या देशात हेअर सलूनला खूप मागणी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा हेअर सलून व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही लोकांचे केस कापून चांगले पैसे कमवू शकता. अनेक जण आपल्या हेअर सलून व्यवसायातून दरमहा हजारो-लाखो रुपये कमावत आहेत.

सर्व प्रथम, जर तुम्हाला केस कसे कापायचे हे माहित नसेल तर चांगल्या हेअर सलूनमधून केस कापायला शिका. यानंतर, एक चांगले ठिकाण शोधा आणि तेथे दुकान सुरू करा. छोट्या स्तरावर मार्केटिंग करा जेणेकरुन तुमच्या परिसरातील लोकांना तुमच्या हेअर सलूनबद्दल माहिती मिळेल. यानंतर, आपल्या हेअर सलूनची नोंदणी करून घ्या जेणे करून भविष्यात आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.