Amazon Black Friday Sale : तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंगचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon या प्लॅटफॉर्मवर सध्या डिस्काऊंटचा प्रचंड धमाका असणार आहे. याचे कारण असे की, ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झालाय.
आज 17 नोव्हेंबर 2023 हा सेल सुरु झाला असून 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत तो असणार आहे. सध्या ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जवळपास अब्जावधी रुपयांची उलाढाल ऑनलाईन शॉपिंगद्वारे होते. या बाजारपेठेत ग्राहक टिकून ठेवण्यासाठी व आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म विविध सेल आणत असतात.
आता याच पार्श्वभूमीवर Amazon वर ब्लॅक फ्रायडे सेल सुरु झाला आहे. यात तुम्हाला सॅमसंग, लेनोवोसह विविध जबरदस्त ब्रँडवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. खास म्हणजे Apple Watch 9 सीरिजवर सर्वाधिक सूट दिली जाणार आहे.
यात सॅमसंग ब्रँड चाहत्यांची चांदी होणार आहे. याचे कारण असे या ब्रॅण्डचे फोन आणि स्मार्ट वॉच अत्यंत कमी किमतीत तुम्ही घरी आणू शकता. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अगदी ह्या भावात तुम्हाला खरेदीची संधी आहे.
कशावर मिळतेय सूट ?
सॅमसंगवर तुम्हाला जास्त डिस्काउंट पाहायला मिळेल.सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रा फोन असेल किंवा Galaxy A54, Samsung Galaxy S23 Ultra+, Samsung Galaxy A53, Samsung Galaxy A23 आदी डिव्हाइसवर हजारोंचा डिस्काउंट तुम्हाला मिळेल. त्यामुळेच तर आम्ही म्हटलंय की, सॅमसंग ब्रँड चाहत्यांची चांदी होणार आहे.
आणखी काय काय मिळेल स्वस्त ?
टॅबलेट घ्यायचे असेल तर ही सुवर्ण संधी आहे. कारण या सेल अंतर्गत सॅमसंग आणि लेनोवो या दोन कंपन्यांच्या टॅब्लेटवर भरपूर डिस्काउंट आहे. अगदी स्वस्तात भेटून जाईल. सॅमसंग आपल्या टॅब्लेटवर 43% पर्यंत सूट देत आहे. ग्राहक 10.4-इंच स्क्रीनसह सॅमसंग गॅलेक्सी टॅब S6 लाइट 199 डॉलरमध्ये घेऊ शकता.
त्याची खरी किंमत $349 आहे. सॅमसंगचे इतर टॅब्लेट Galaxy Tab A8, Galaxy Tab A7 आणि Galaxy Tab A7 या भन्नाट टॅब वर तर 35% पर्यंत सूट मिळतेय. Lenovo च्या Tab M9-2023 वर 30% डिस्काउंट आहे. त्यामुळे जर तुम्हाला कमी किमतीत भारी भारी वस्तू खरेदी करायच्या असतील तर या सेलचा नक्कीच लाभ घ्या.