तुम्ही आज कुठल्या परिस्थितीत आहात किंवा कुठल्या आर्थिक परिस्थितीत जगत आहात याला पाहिजे तितके महत्त्व न देता आहे त्या परिस्थितीतून काहीतरी उच्च यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत राहणे व यशाच्या शिखराकडे सातत्याने कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.
एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती कितीही हलाखीची राहिली तरी त्याला जर यशस्वी व्हायचेच असेल तर तो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढतोच व यशस्वी होऊन दाखवतो.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण महाराष्ट्रातील रहिमतपूर गावात जन्म झालेल्या कैलास काटकर यांची यशोगाथा पाहिली तर या तरुणाने शिक्षण तर फक्त दहावीपर्यंतच केलेले आहे व त्यानंतर 400 रुपये पगारावर एका रेडिओ दुरुस्ती दुकानांमध्ये काम देखील केले.
परंतु याच तरुणाने संगणक क्षेत्रातील महत्त्वाची असलेली क्विक हिल टेक्नॉलॉजी कंपनी उभारली व ती आज 14 हजार कोटी रुपये मूल्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांची यशोगाथा आपण बघणार आहोत.
क्विक हिल कंपनीचे संस्थापक कैलाश काटकर यांची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील रहिमतपूर गावामध्ये कैलास काटकर यांचा जन्म झाला. परंतु त्यांची घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती व त्यामुळे त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण करता आलेली नाही.
कुटुंबाला आर्थिक दृष्टिकोनातून हातभार लागावा म्हणून ते पुण्यामध्ये कामासाठी आले व त्या ठिकाणी रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीच्या दुकानांमध्ये महिना चारशे रुपये पगारात काम करायला सुरुवात केली. हळूहळू रेडिओ दुरुस्ती मध्ये कौशल्य प्राप्त केल्यानंतर 1991 मध्ये स्वतःचे दुकान उघडण्याचे ठरवले व पंधरा हजार रुपयांचे गुंतवणूक करून ते दुकान उघडले देखील.
या सगळ्या आयुष्याच्या चढाओढीमध्ये घर खर्च चालवणे व लहान भाऊ संजय काटकर यांच्या शिक्षणाचा खर्च या दोन्ही ठिकाणी कसातरी खर्च ते भागवत होते. यांचे लहान बंधू कम्प्युटर सायन्स मध्ये शिक्षण घेत होता.
कैलास काटकर यांची अशा पद्धतीने झाली कम्प्युटरशी ओळख
तसे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले कैलास यांचा आणि संगणकाचा लांब लांब पर्यंत कुठलाही प्रकारचा संबंध नव्हता. परंतु एकदा ते बँकेमध्ये काही कामानिमित्त गेले व त्या ठिकाणी पहिल्यांदाच त्यांनी कॅम्पुटर पाहिला व ते त्यामुळे खूप इम्प्रेस झाले. व्हिडिओ दुरुस्तीचे काम करत असतानाच त्यांनी कॅम्पुटर शिकण्यासाठी शॉर्ट टर्म कोर्सला प्रवेश घेतला. त्यानंतर एक कॅम्पुटर देखील विकत घेतला व त्यावर काम करायला सुरुवात केले.
हळूहळू कॉम्पुटर चे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी त्यांना ओळख झाली व संगणक दुरुस्तीचे काम देखील त्यांनी सुरू केले. यामध्ये त्यांनी 1993 यावर्षी CAT संगणक दुरुस्ती आणि सेवा या नावाची कंपनी सुरू केली.
जेव्हा त्यांच्याकडे कम्प्युटर रिपेरिंग साठी येत होते तेव्हा त्यांना कळून चुकले की रिपेरिंग साठी येणारे बहुतेक कॅम्पुटर व्हायरस मुळे खराब होतात व या गोष्टीमुळे त्यांना कल्पना सुचली की जर आपण अँटीव्हायरस बनवला आणि तो विकला तर आपण माध्यमातून चांगला पैसा कमवू शकतो व अशा पद्धतीने क्विक हिल कंपनीची स्थापना झाली.
क्विक हिल कंपनीची मुहूर्तमेढ रोवली गेली
कैलास यांच्या मनामध्ये जे काही अँटिव्हायरस बनवण्याची कल्पना आली ती त्यांनी त्यांचे भाऊ संजय यांना सांगितली व दोन्ही भावांनी मिळून कॅम्पुटर रिपेरिंगच्या दुकानात अँटीव्हायरस तयार केला व दुरुस्तीसाठी आलेल्या कम्प्युटरवर त्याचा ट्राय करून पाहिला.
या ट्राय नंतर मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले व 1995 मध्ये त्यांनी पहिले अँटीव्हायरस उत्पादन बाजारात आणले व त्याला 700 रुपयांना विकले. ग्राहकांकडून देखील या अँटिव्हायरसला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळायला लागल्यानंतर मात्र काटकर बंधूंनी संपूर्ण फोकस अँटिव्हायरस वर केंद्रित केले व 2007 मध्ये त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव क्विक हिल टेक्नॉलॉजी असे ठेवले.
आज हळूहळू या कंपनीने खूप मोठा प्रवास पार केला असून संपूर्ण जगात हा ब्रँड प्रसिद्ध आहे. एका मराठमोळ्या तरुणाने सुरू केलेली ही कंपनी आज अनेक देशांपर्यंत पोहोचली असून जपान तसेच अमेरिका व आफ्रिका, इतकेच नाही तर यूएई या ठिकाणी देखील या कंपनीचे कार्यालय आहेत.