घरातील कटकटींना वैतागून केली नमकीन विकायला सुरवात, आज ८ वी पास व्यक्तीने उभी केली १००० कोटींची कंपनी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success story : तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही नक्कीच विविध पदार्थ नाश्त्यात किंवा जेवणात खाल्ले असतील. तसेच विविध नमकीन पदार्थांचा देखील आस्वाद घेतला असेल.

सध्याला नमकीन म्हटलं की बिकाजी फूड्स हे नाव समोर येते. कारण ते इतके प्रसिद्ध आहे की तुम्ही ते नक्कीच टेस्ट केले असणार.

सध्या बिकाजी फूड्स ही भारतातील निवडक मोठ्या कंपन्यांपैकी एक मोठी कंपनी आहे. तिचे सध्याचे व्हॅल्युएशन १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण ही बिकाजी फूड्स एवढी मोठी कंपनी कशी बनली? ८ वी पास व्यक्तीने असा नेमका काय करिष्मा केला? चला जाणून घेऊयात प्रेरणादायी यशोगाथा.

बिकाजी फूड्स या कंपनीचे संस्थापक शिवरतन अग्रवाल आहेत. गंगा बिशन अग्रवाल हे त्यांचे आजोबा की ज्यांनी प्रसिद्ध हल्दीराम या कंपनीची सुरवात केली होती. असे असताना शिवरतनने ‘हल्दीराम’ सोडून स्वतःचा ‘बिकाजी’ ब्रँड सुरू केला. आणि ती आज १००० कोटींचा टर्न ओहर असणारी कंपनी बनली आहे.

हल्दीराम सोडून Bikaji Foods सुरु केले

शिवरतन यांचे वडील आणि आजोबा दोघेही नमकीन बनवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांनी हल्दीराम कंपनी चांगलीच नावारूपाला आणली. त्यांच्यामुळेच शिवरतन यांना स्नॅक्स बनवायच्या व्यवसायात रुची निर्माण झाली.

हल्दीराम कंपनी सुरू झाली तेव्हा अल्पावधीतच कंपनीला यश मिळाले. त्यामुळे अनेक गोष्टींवरून कुटुंबात भांडणे होऊ लागली. त्यामुळे शिवरतनने स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. १९९३ मध्ये शिवरतनने बिकाजी फूड्स कंपनी सुरू केली.

विविध प्रकारचे स्नॅक्स झाले लोकप्रिय

बिकाजी फूड्स सुरू केल्यानंतर शिवरतनने आपली कंपनी पुढे नेण्यासाठी कठोर मेहनत घेतली. त्यांनी कंपनीमध्ये विविध प्रकारचे स्नॅक्स बनवण्यास सुरुवात केली. बिकाजी फूड्स सध्या नमकीन पदार्थ आणि विविध प्रकारच्या मिठाई बनवतात. ते सध्या त्यांचा माल भारतात तर विकतातच परंतु यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील स्नॅक्स निर्यात करतात.

८ वी पास व्यक्तीने मेहनतीने बनवली १००० कोटींची कंपनी

आज ही कंपनी तब्बल १००० कोटींचे व्हॅल्युएशन असलेली कंपनी बनली आहे. कंपनीत सध्या ३०० हून अधिक प्रकार बनवले जातात. आज या कंपनीने तब्बल ४० देशांत आपला व्यवसाय विस्ताराला आहे.