गायरान जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्रातील जमीन कायदा सांगतो की…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gairan Land : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण महाराष्ट्रातील जमीन कायद्याच्या एका महत्त्वाच्या तरतुदी बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर गेल्या काही वर्षांपासून गायरान जमिनीचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेस आला आहे.

कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यास सांगितले जात आहे.

यामुळे नागरिकांमध्ये गायरान जमिनीबाबत जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आपण गायरान जमिनीबाबतच्या कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीची माहिती पाहणार आहोत.

अनेकांच्या माध्यमातून गायरान जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर होऊ शकते का ? गायरान जमीन सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या नावावर करता येते का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

म्हणून आज आपण गायरान जमिनी नावावर होऊ शकते की नाही याबाबत कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गायरान जमीन म्हणजे कोणती जमीन ?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या जमिनीला गायरान जमिनीचा दर्जा दिलेला असतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गायरान जमीन म्हणजे अशी जमीन जी आपल्या गावाच्या अवतीभोवती सार्वजनिक वापराकरिता, स्मशानभूमीकरिता, गुरेढोरे चारण्याकरिता ग्रामपंचायत किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असणारी जमीन. अशा जमिनीवर शासनाची मालकी असते.

गायरान जमिनीचे मालक शासनच असते मात्र ताबा हा संबंधित ग्रामपंचायतीकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे असतो. गायरान जमिनीचा सातबारा असतो. या सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद असते. 

गायरान जमीन नावावर होऊ शकते का ?

राज्यातील जमीन कायद्यानुसार गायरान जमीन ही कोणाच्याच नावावर होऊ शकत नाही. या जमिनीचे मालक शासन असते. जमिनीचा ताबा मात्र संबंधित ग्रामपंचायतकडे असतो.

याचा वापर हा सार्वजनिक उपयोगासाठी केला जातो. सार्वजनिक उपयोगाशिवाय ही जमीन इतर दुसऱ्या कामासाठी वापरली जाऊ शकत नाही. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शासन असा उल्लेख असतो.

गायरान जमीन वापराकरिता किंवा हस्तांतरणाकरिता जिल्हाधिकारी महोदय यांची परवानगी आवश्यक असते. एकंदरीत गायरान जमीन ही खाजगी व्यक्तीच्या नावावर होऊ शकत नाही.