गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस : Ganpati Visarjan Status In Marathi, Ganpati visarjan message in marathi

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच रविवारी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

श्रावण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. महाराष्ट्रात दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान होतात.

बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत आणि पूजाअर्चनेमध्ये भक्तगण इतके तल्लीन होतात की बाप्पाला निरोप द्यायचा क्षण कधी जवळ आला हे त्यांना समजतही नाही. दहा दिवसानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जाते.

त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. गणपती विसर्जनाच्या या भावूक क्षणी सोशल मीडियावर ठेवा हे खास स्टेटस (Ganpati Visarjan Sad Status In Marathi), विसर्जन कोट्स (Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi), अनंत चतुर्दशी कोटस (Anant Chaturdashi Quotes In Marathi) आणि प्रियजनांना पाठवा Ganpati Visarjan Message In Marathi

अनंत चतुर्दशी- गणपती विसर्जन मेसेजेस!


बाप्पाचं आणि माझं एक छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला काहीच कमी पडू  देत नाही… गणपती बाप्पा मोरया


तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
पुढच्या वर्षी लवकर या”


“गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…”


वंदितो तूज चरण,
आर्जव करितो गणराया…
वरदहस्त असूद्या माथी,
राहुद्या सदैव छत्रछाया…
बाप्पा मोरया!


अपराध भक्तांचे उदरात, साठवते लंब उदर तुझे,
प्रार्थना मी इथे करतो पण त्रिभुवनात आहे गुणगाण तुझे… गणपती बाप्पा मोरया


“आभाळ भरले होते तू येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी करोना दूर करून ये लवकर
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”


निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं, काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं


“आज अनंत चतुर्दशी!
सर्व गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या
एक लाडू फुटला,गणपती बाप्पा उठला”


बाप्पा आज तू जात आहेस, माझं मनच नाही बघ आभाळपण रडत आहे

१०
“रिकामं झालं घर, रिता झाला मखर
पुढल्या वर्षी लवकर येण्यास
निघाला आमचा लंबोदर!”