ओप्पोच्या ‘ह्या’ शानदार स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट ; किती आणि कोठे ? वाचा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-आपण ओप्पो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. फ्लिपकार्ट या देशातील ईकॉमर्स साइटने ओप्पोच्या स्मार्टफोनवर सेल सुरू केला आहे, ज्याला ओप्पो डेज सेल असे नाव आहे.

तर आपण ओप्पो ब्रँड स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल तर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट सेलचा आनंद घेऊ शकता. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे जो 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या मोबाईलवर किती सूट मिळतेय ते –

ओप्पो A33 वर 15% सूट:-  सेलमध्ये 15 टक्के सूट मिळाल्यानंतर हा ओप्पो मोबाइल फोन 10,990 रुपये (एमआरपी 12,990 रुपये) मध्ये विकला जात आहे. महत्त्वाच्या फीचर्सविषयी बोलायचे झाले तर या फोनमध्ये 90 हर्ट्झ पंच होल डिस्प्ले, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 13 मेगापिक्सलचा ट्रिपल रीअर कॅमेरा, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. तुम्हाला या फोनवर जास्तीची बचत करायची असेल तर एक्स्चेंज किंवा प्रीपेड व्यवहारांवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील आहे.

ओप्पो रेनो 2 :- ओप्पो रेनो 2 हा 48 मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 20 एक्स डिजिटल झूम सपोर्टसह सुसज्ज असलेल्या या ओप्पो मोबाइल फोनचे 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 2 टक्के सवलतीच्या नंतर 38,990 रुपये (एमआरपी 39,990 रुपये) मध्ये विकले जात आहेत. आपण या फोनवर 12 हजार रुपये देखील वाचवू शकता कारण एक्सचेंज किंवा प्रीपेड व्यवहारांवर 12,000 रुपयांची अतिरिक्त सूट आहे.

ओप्पो A53 :- सेल्फीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सरसह सज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000 एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे. या ओप्पो फोनचे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 18 टक्के सूट मिळाल्यानंतर 12,990 रुपये (एमआरपी 15,990 रुपये) मध्ये विकले जात आहेत. आपल्याला या फोनसह अतिरिक्त बचत करायची असल्यास, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआयवर 5 टक्के त्वरित सूट देखील आहे.

ओप्पो F17 :- स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आणि 30 वॅटचा फ्लॅश चार्ज 4.0, क्वाड रीअर कॅमेरा सेटअप, 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 4015 एमएएच बॅटरी फोनमध्ये आहे. या फोनचे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 19 टक्के सवलतीच्या नंतर 16,990 रुपये (एमआरपी 20,990) मध्ये विकले जात आहेत. आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड ईएमआयवर 5 टक्के इंस्टेंट डिस्काउंट देखील आहे.

ओप्पो A11K :- या बजेट स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 4230 एमएएच मजबूत बॅटरी, 6.22 इंचाची एचडी + डिस्प्ले, स्पीड व मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक हेलियो पी 35 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ओप्पो सेलमध्ये हा फोन 2500 रुपयांच्या सूटनंतर 8,490 रुपयांना विकला जात आहे, या फोनची एमआरपी 10,990 रुपये आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24