तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये उत्तम फीचर्स आणि उत्तम लुक असलेले फोन घ्यायचे असेल तर तुम्ही मोटोरोलाचे कमी किमतीतले उत्तम असे स्मार्टफोन खरेदी करू शकतात.
मोटोरोला कंपनीचे तीन पावरफुल स्मार्टफोन खूप महत्त्वाचे असून त्याची किंमत देखील दहा हजार रुपये पेक्षा कमी आहे. कमीत कमी किमतींमध्ये जास्तीत जास्त फीचर्स असलेले हे स्मार्टफोन तुम्ही सणासुदीच्या कालावधीत खरेदी करू शकतात व चांगला स्मार्टफोनचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
हे आहेत कमी किमतीतले मोटोरोला कंपनीचे उत्तम स्मार्टफोन
1- मोटोरोला GO4- या स्मार्टफोन मध्ये चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असून या स्मार्टफोनची किंमत फक्त सहा हजार 999 रुपये आहे. कंपनीच्या या एन्ट्री लेवल फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंच डिस्प्ले मिळतो.हा डिस्प्ले 90Hz चा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो व रॅम बूस्टर फीचर्सच्या मदतीने फोनची एकूण रॅम आठ जीबी पर्यंत जाते.
या फोनचा मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. तसेच उत्तम आवाजासाठी या फोनमध्ये डॉल्बी ॲटमॉस देखील देण्यात आलेला आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे व ही बॅटरी 20 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.
2- मोटोरोला e22s- यामध्ये चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असून या फोनची किंमत फ्लिपकार्टवर 8999 रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंच एचडी डिस्प्ले मिळतो व हे आयपीएस एलसीडी पॅनल 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
तसेच या फोनचा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असून यात दोन मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा देण्यात आलेला आहे व उत्तम सेल्फी करिता तुम्हाला आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.
3- मोटोरोला G45 5G- हा फोन फ्लिपकार्ट वर 9999 रुपयांना उपलब्ध आहे व या फोनमध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले दिला असून हा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच यामध्ये अल्ट्रा प्रीमियम वेगन लेदर डिझाईन पाहायला मिळते.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून सेल्फी साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनची बॅटरी 5000mAh असून शक्तिशाली आवाजासाठी या फोनमध्ये स्टेरिओ स्पीकरसह ड्युअल डॉल्बी एटमॉस दिलेला आहे.