स्पेशल

वनप्लस आणि सॅमसंगचा ‘हे’ तगडे फीचर्सचे फोन स्वस्तात खरेदी करण्याची मोठी सुवर्णसंधी! या आठवड्यामध्ये मिळेल मोठी सूट

Published by
Ajay Patil

कुणाला जरी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर प्रामुख्याने परवडणाऱ्या किमतीमध्ये चांगली वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याकडे कल आपल्याला दिसून येतो. सध्या जर आपण स्मार्टफोन बाजारपेठ पाहिली तर यामध्ये अनेक दिग्गज कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहे.

त्यामुळे ग्राहकांना देखील आता स्मार्टफोनची निवड करताना खूप सोपे जाते. तसेच बऱ्याच स्मार्टफोन वर आता ऑफर देखील देण्यात येत असल्यामुळे चांगली वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी देखील प्राप्त झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जर वनप्लस किंवा सॅमसंग या कंपन्यांचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर मात्र हा आठवडा तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलेला आहे.

 वनप्लस आणि सॅमसंगवर ॲमेझॉनच्या माध्यमातून मिळत आहे बंपर ऑफर

जर तुम्हाला वनप्लस किंवा सॅमसंग फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ॲमेझॉनच्या टॉप डील्स ऑफ द वीकमध्ये एक बंपर ऑफर आहे व या डीलमध्ये तुम्ही onePlus Nord CE 4 Lite, onePlus Nord CE4 आणि सॅमसंग गॅलेक्सी M35 5G मोठ्या सवलती वर तुम्ही खरेदी करू शकता.

या वनप्लसच्या सॅमसंगच्या फोनवर संपूर्ण आठवडाभर उत्तम बँक सूट आणि कॅशबॅक मिळेल व तुम्ही हे फोन उत्तम एक्सचेंज बोनस देखील खरेदी करू शकतात. एक्सचेंज बोनस ऑफरमध्ये तुम्हाला जी काही सवलत मिळते हे तुमच्या फोनची स्थिती कशी आहे? ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

 किती मिळत आहे oneplus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनवर मिळणारी ऑफर आणि काय आहेत या फोनची वैशिष्ट्ये?

वनप्लसच्या या फोनची किंमत 19999 रुपये असून आठवड्यातील ॲमेझॉनच्या या टॉप डील्समध्ये या फोनवर दोन हजार रुपयांची सवलत दिली जात आहे व या सवलतीसाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँक कार्डाच्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील.तसेच कंपनी या फोनवर एक हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे.

तसेच एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही या फोनची किंमत अठरा हजार आठशे रुपयांनी कमी करू शकतात. जर या फोनचे फीचर्स बघितले तर यामध्ये 120Hz रिफ्रेश फ्रेश रेटसह 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे व त्याची बॅटरी क्षमता 5000mAh असून जी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

या डील मध्ये तुम्ही onePlus Nord CE4 आठ जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 24998 रुपयांना खरेदी करू शकतात. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले तर तुम्हाला तीन हजार रुपये पर्यंत कॅशबॅक देखील यावर दिला जात आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 23550 रुपयांनी स्वस्तात मिळू शकतो. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट्सह एक्वा टच AMOLED डिस्प्ले दिला असून या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला असून यामध्ये तुम्हाला शंभर वाट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

 सॅमसंग गॅलेक्सी M35 5G स्मार्टफोन किती मिळत आहे ऑफर?

सॅमसंगच्या फोनची किंमत 19999 रुपये असून हा फोन ॲमेझॉनच्या या आठवड्यातील टॉप डीलमध्ये दोन हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. ही झटपट सवलत सर्व बँक कार्डसाठी उपलब्ध असून या फोनवर 1000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे.

एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 18999 पर्यंत तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो. या फोनमध्ये कंपनीने 6.6 इंचाचा फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेट्सला सपोर्ट करतो. या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे व यामध्ये 6000mAh बॅटरी दिलेली आहे.

Ajay Patil