स्पेशल

कार खरेदीचा आहे हा सुवर्णकाळ! कार खरेदीवर मिळत आहेत मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट; वाचा कोणत्या मॉडेलवर मिळत आहे किती डिस्काउंट?

Published by
Ajay Patil

सध्या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक महत्त्वाचा आणि सुवर्णसंधी असलेला कालावधी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या कालावधीमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांनी सवलतीच्या ऑफर आणलेल्या असून त्यामुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. तुम्हाला देखील कार विकत घ्यायची असेल व त्या पद्धतीची तयारी तुम्ही करत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

कारण कंपनीच्या माध्यमातून जवळपास चार वर्षानंतर अशा प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. याबाबत आपण एफएडीए अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार बघितले तर सध्या अनेक कारवर ऑफर दिल्या जात असून उदाहरणच घ्यायचे झाले तर स्विफ्ट सारख्या हॅचबॅक वर १५००० ते 20000 पर्यंत आणि होंडा सिटी सारख्या कारवर 50 हजार पेक्षा जास्त डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे व यामध्ये कॉर्पोरेट रॉयल्टी आणि एक्सचेंज ऑफर आणि रोख सवलती सारख्या बाबींचा समावेश आहे.

 वाचा कोणत्या मॉडेलवर मिळत आहे किती रुपयांची सूट?

याबाबतीत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या डाटा नुसार बघितले तर काही उच्च ऑफर हॅचबॅक आणि सेडानवर उपलब्ध असून मारुती सुझुकी अल्टो K10 वर बेचाळीस हजारापर्यंत( मॅन्युअल पेट्रोल व्हेरीएन्टवर जास्तीत जास्त) सूट मिळत आहे तर त्यासोबतच मारुती सुझुकी वॅगनार वर 25 हजारापासून ते तीस हजारापर्यंत सूट देण्यात येत आहे.

तसेच ह्युंदाईच्या Hyundai Grand i10 Nios वर अठरा हजारापासून ते 35000 पर्यंतचे फायदे देण्यात येत आहेत. तसेच ह्युंदाई Aura या कारवर 23 हजार ते 40 हजार रुपयांच्या फायदा मिळत आहे. यामध्ये सीएनजी वर अधिक सवलत देण्यात येत असून होंडा अमेझ वर 40000 पेक्षा जास्त सवलत मिळत आहे.

यामध्ये एक्सचेंज ऑफर आणि कार्पोरेट सवलतींचा समावेश आहे. तसेच महागडे इलेक्ट्रिक वाहनांवर आणि एसयूव्हीवर देखील सूट मिळत आहे. यामध्ये ह्युंदाई Alcazar वर 45 हजार पासून ते 65 हजार पर्यंत सूट मिळत आहे. महिंद्रा एक्सयुव्ही400 EV वर दीड लाख ते होंडा सिटी eHEV वर 65 हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.

 कंपन्या का देत आहेत अशाप्रकारे सूट?

कंपन्यांकडे असलेला वाढता साठा हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे डीलर्सचे म्हणणे आहे. एफएडीएचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले की जून आणि जुलै हे एक संथ महिने असून त्यामुळे साहजिकच सवलत जास्त असते. पण यामध्ये इन्व्हेंटरी लेवल 55 ते 60 दिवस असते व गेले तीन महिन्यापासून त्यामध्ये वाढ होत आहे.

त्यातल्या त्यात महिंद्रा थारसारखी काही मॉडेल्स अजून देखील प्रतीक्षा यादीत आहे व नवीन स्विफ्ट आणि एर्टिगासारख्या मारुती सुझुकीच्या इतर कारवर कोणतीही सूट नाही. फक्त सर्वसाधारणपणे हॅचबँक आणि सेडानवर या सवलती मिळत आहेत. जर आपण किरकोळ किमतीची टक्केवारी बघितली तर त्यामध्ये सवलतीच्या बाबतीत लहान कार आघाडीवर असल्याचे आपल्याला ऑटो उद्योगातील तज्ञ सांगतात.

Ajay Patil