स्पेशल

Numerology: ‘या’ 4 तारखांना जन्मलेल्या मुली वडील तसेच पती व कुटुंबाकरिता असतात भाग्यशाली! तुमच्या मुलीची आहे का यात जन्मतारीख?

Published by
Ajay Patil

Numerology: भारतीय परंपरे मध्ये आणि खासकरून हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्त्व आहे व त्यासोबतच अंकशास्त्राला देखील तितकेच महत्त्व आहे. यापैकी ज्योतिष शास्त्र हा जीवनाचा एक भाग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून आपण कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच त्याचे भविष्य इत्यादी विषयीची माहिती काढू शकतो.

ज्योतिष शास्त्राचे अनेक भाग असून एक भागाचे वेगळे वैशिष्ट्ये व गणना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह तसेच नक्षत्र आणि राशींच्या आधारे गणना केली जाते तर ज्योतिष शास्त्राच्या अंकशास्त्र या शाखेमध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच त्याचे भविष्य हे व्यक्तीच्या जन्मतारखेच्या संख्येच्या आधारे केले जाते.

या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनाची माहिती काढण्याकरिता जन्मतारखेचे अंक जोडून मुलांक आणि भाग्यांक मिळवले जातात. जन्म तारखेचे संबंधी जे काही मुलांक किंवा भाग्यांक म्हणून संख्या असतात त्या नऊ ग्रहांशी संबंधित असतात

व यांचा व्यक्तीच्या जीवनाच्या अनेक गोष्टींमध्ये खूप महत्त्वपूर्ण स्थान असते. त्यामुळे आपण या लेखामध्ये कोणत्याही महिन्याच्या तीन, 12 तसेच 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या म्हणजेच मुलांक तीन असणाऱ्या मुली जीवनामध्ये कशा असतात याबद्दलची माहिती बघणार आहोत.

 कोणत्याही तारखेच्या 3,12,21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या मुली कशा असतात?

1- वडिलांसाठी असतात भाग्यवान ज्या मुलीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या या चार तारखांना झालेला असतो त्या मुलींचे वडील हे खूप भाग्यवान समजले जातात. या मुली स्वतःचेच नशीब पालटत नाही तर वडिलांचे देखील भाग्य बदलतात. या तारखांना जन्मलेल्या मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप बदल आणि सुधारणा होते.

2- खूप मेहनती असतात कोणत्याही महिन्याच्या या चार तारखांना जन्मलेल्या मुली लहानपणापासून खूप मेहनती आणि कष्टाळू असतात. जीवनामध्ये त्यांना जे ध्येय साध्य करायचे असते ते ध्येय साध्य करण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतात. स्वतःच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर ते जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात व कुटुंबाला देखील गौरव मिळवून देतात.

3- बुद्धीने हुशार असतात या तारखांना जन्मलेल्या मुली खूप हुशार असतात व त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधून सहजपणे मात करतात. समस्या कितीही कठीण असली तरी ती कशा पद्धतीने सोडवायची हे या मुलींना चांगले माहित असते.

4- लग्नानंतर पतीचे देखील नशीब बदलतात या मुली स्वतःच्या कष्टाच्या जीवावर स्वतःचे नशीब उज्वल बनवतात. इतकेच नाहीतर लग्नानंतर पतीचे देखील नशीब बदलवण्यामध्ये या मुली खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. या मुलींच्या जीवनात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो व त्यांचे जीवन धन आणि आशीर्वादाने भरलेले असते.

5- लक्झरी लाइफ जगायला आवडते या तारखांना जन्मलेल्या मुलींना लक्झरी लाईफ जगायला आवडते व त्या मुली त्यांच्या पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल खूप सरळ आणि स्पष्ट असतात. या मुली त्यांचे छंद आणि आवड स्वतः चांगल्या प्रकारे पूर्ण करतात.

6- तत्वांवर ठाम असतात या मुली तत्त्वांना खूप महत्त्व देणाऱ्या असतात व जीवनामध्ये त्या नेहमीच तत्त्वांवर ठाम असतात. या मुली त्यांच्या जीवनामध्ये स्वतः हा तत्वांचे पालन करत नाहीत तर इतरांना देखील तत्त्वांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

 (टीप या ठिकाणी दिलेली माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा अथवा समर्थन करत नाहीत.)

Ajay Patil