Best Beaches In India For New Year Celebration:- काही दिवसांनी आता 2025 या नवीन वर्षाचे आगमन होईल व 2024 या वर्षाला निरोप देण्यात येईल. अशा प्रकारचा प्रसंग हा प्रत्येक वर्षी येत असतो व खास पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत व जुन्या वर्षाला निरोप या दोन्ही गोष्टींचे एक आगळेवेगळे सेलिब्रेशन आजच्या तरुणाईच्या माध्यमातून केले जाते.
अशाप्रकारे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन साठी बरेच जण भारतातील अनेक ठिकाणी भेटी देतात व त्या ठिकाणी अशा पद्धतीचे सेलिब्रेशन करतात. आपण बघतो की नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करता जास्त करून गोवा आणि त्या ठिकाणी असलेल्या बीचेस यांना खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.
गोव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते व गोवा एक परफेक्ट ठिकाण समजले जाते व या ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठीची प्लॅनिंग देखील बरेच जण करत असतात. परंतु अशा नववर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होते की सगळ्याच पद्धतीने दरवाढ होते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका देखील बसू शकतो.
त्यामुळे तुम्हाला देखील या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एखाद्या बीचवर सेलिब्रेशन करायचे असेल तर तुम्ही गोव्या व्यतिरिक्त भारतातील काही महत्त्वाच्या बीचवर जाऊन ते करू शकतात. कारण हे भारतातील बीच गोव्यातील बीचपेक्षा कमी नाहीत. त्याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतातील या बीच अर्थातच समुद्रकिनाऱ्यांना भेट द्या
1- राधानगर बीच,अंदमान- अंदमान येथील राधानगर ब्रिज हे खूप प्रसिद्ध असून आशिया खंडातील सर्वात मोठे समुद्रकिनाऱ्यांमध्ये याची गणना होते. या ठिकाणी असलेले पांढरे आणि स्फटिक स्वच्छ पाणी आणि हिरवळ मनाला मोहून टाकते
व नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. तसेच तुम्हाला या ठिकाणी गर्दी देखील कमी पाहायला मिळेल.तुम्ही जर अंदमान येथील राधानगर बीचला भेट दिली तर तुम्ही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक वॉटर स्पोर्टचा आनंद घेऊ शकतात.
2- कन्याकुमारी बीच,तामिळनाडू- कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये बघितले तर हा समुद्रकिनारा हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांना मिळतो. या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अनोखे असे दृश्य पाहू शकतात.
प्रत्येक वर्षाला या ठिकाणी न्यू इयर सेल साजरा करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या ठिकाणी पाहण्यासारखे खूप काही असून तुम्ही इथल्या मैदानी भागात अक्षरशः हरवून जाल इतकी या ठिकाणची जागा सुंदर आहे.
3- मांडवी बीच,गुजरात- तुम्हाला जर नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायचे असेल व तुम्हाला जर शांत ठिकाण हवे असेल तर तुमच्या करिता गुजरात राज्यातील मांडवी बीच म्हणजेच मांडवी समुद्रकिनारा एक परफेक्ट असे ठिकाण आहे.
या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर उंट स्वारीचा आनंद तुम्ही घेऊ शकतात व सूर्यास्ताचे सुंदर असे नयनरम्य दृश्य देखील पाहू शकतात. त्यामुळे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करिता हा पर्याय देखील चांगला आहे.
4- चेराई बीच,केरळ- केरळ राज्यातील चेराई बीच हा अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा समुद्रकिनारा असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते.तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन नवीन वर्ष साजरे करणे खूप गरजेचे आहे.
या ठिकाणी उसळणाऱ्या उंच उंच समुद्राच्या लाटा तुम्हाला एक वेगळ्या विश्वात घेऊन जातात व एक आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळतो.