Gold And Silver Rate : गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्या होत्या. चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात काही प्रमाणात घसरण झाली होती. यामुळे नवीन सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. किमतीत घसरण झाली असल्याने गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी खरेदी वाढली होती.
मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किमती वधारल्या आहेत. खरे तर सध्या फेस्टिवल सीजन सुरू आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात भारतात सोने आणि चांदीची खरेदी वाढत असते.

यंदाही या काळात या मौल्यवान धातूंची खरेदी वाढणार आहे. दरम्यान जर तुम्हीही हे मौल्यवान धातू खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार असाल तर बाजारात जाण्याआधी आजच्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कशा आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती दररोज बदलत असतात. गेल्या आठवड्यात बरेच दिवस या मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच या धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
काल 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 69 हजार 940 रुपये एवढी होती. मात्र आज किमतीत थोडी वाढ झाली असून दहा ग्रॅम सोन्याची किमत 72 हजार 10 रुपयावर पोहचळी आहे.
काल चांदीची किंमत 80 हजार आठशे रुपये प्रति किलो एवढी होती आज मात्र यात 5000 रुपयांची वाढ झाली आहे म्हणजे आज चांदीची किंमत 85 हजार आठशे रुपये प्रति किलो नमूद करण्यात आली आहे.
चांदीच्या किमती संपूर्ण देशात एकसारख्याच असतात. पण सोन्याच्या किमती शहरानुसार बदलतात. यामुळे आता आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किंमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे – आज पुण्यात 22 कॅरेट सोने 65,890 प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 71880 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
मुंबई – मुंबईमध्ये 24 कॅरेट सोने 71880 रुपये आणि 22 कॅरेट सोने 65,890 प्रति तोळा या दरात उपलब्ध आहे.
नाशिक – नाशिक मध्ये आज 24 कॅरेट सोने 71880 रुपये आणि 22 कॅरेट सोने 65,890 प्रति तोळा या दरात उपलब्ध आहे.
नागपूर – नागपूर मध्ये आज 22 कॅरेट सोने 65,890 प्रति दहा ग्रॅम या दरात उपलब्ध आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 71880 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.