Gold Loan Calculator : अलीकडे महागाईचा आलेख प्रचंड वाढला आहे आणि यामुळे कधी पैशांची कमतरता भासेल हे काही सांगता येत नाही. हेच कारण आहे की, अनेकजण अलीकडे बँकांकडून कर्ज काढतात. अचानक पैशांची गरज भासली तर काही लोक वैयक्तिक कर्ज काढतात. याशिवाय, स्वर्ण कर्जाचा म्हणजेच गोल्ड लोनचा पर्याय सुद्धा ग्राहकांपुढे असतो.
दरम्यान, जर तुम्हीही गोल्ड लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, गोल्ड लोन हे सुरक्षित कर्ज प्रकारात येतं यामुळे वैयक्तिक कर्जापेक्षा गोल्ड लोनचे व्याजदर कमी असतात. यामुळे वैयक्तिक कर्ज काढण्याऐवजी अनेकजण गोल्ड लोनचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत.

विशेष बाब म्हणजे गोल्ड लोन हे ग्राहकांना परवडते सुद्धा. कमी व्याजदरामुळे गोल्ड लोन घेणे फायद्याचे ठरते. गोल्ड लोन कमी कागदपत्रात आणि लवकर मंजूर होतं. पण जर समजा दहा ग्रॅम सोनं असेल तर ते सोनं गहाण ठेवून किती गोल्ड लोन मंजूर होऊ शकत ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? चला आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
10 ग्रॅम सोने असल्यास किती गोल्ड लोन मंजूर होणार?
24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने असेल तर : सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 9753 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. यानुसार 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 97 हजार 530 रुपये एवढी होते. जर समजा बँकेचा LTV 75% असेल तर या सोन्यावर ग्राहकांना 73 हजार 147 रुपये कर्ज मिळू शकते. पण जर LTV 90% असल्यास 87 हजार 777 रुपये कर्ज स्वरूपात मिळू शकतात.
22 कॅरेट सोने असल्यास : 22 कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव 8,940 इतका आहे. त्यानुसार दहा ग्रॅम सोन्याचे मूल्य 89,400 एवढे होते आणि अशा परिस्थितीत जर समजा बँकेचा LTV 75% असेल तर 67 हजार 50 रुपये कर्ज स्वरूपात मिळू शकतात आणि 90% LTV असल्यास 80 हजार 460 रुपये कर्ज मिळू शकते.
18 कॅरेटच सोन असल्यास : सध्या 18 कॅरेट सोन्याचा भाव 7,315 रुपये प्रति ग्राम एवढा आहे. यानुसार दहा ग्रॅम सोन्याची किंमत 73 हजार 150 रुपये एवढी होते. आता जर समजा बँकेचा LTV 75% असेल तर अशा प्रकरणात 54,862 रुपये कर्ज मिळणार आहे आणि जर समजा LTV 90% असेल तर 65,835 रुपये कर्ज मिळेल.