Gold Price Today : 5 दिवसापूर्वी सोन्याने एक नवा रेकॉर्ड बनवला, तो रेकॉर्ड म्हणजे या मौल्यवान धातूची किंमत इतिहासात पहिल्यांदाच एका लाखाच्या वर गेली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याने एका लाखाचा टप्पा पार केला. या दिवशी शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती.
या दिवशी सोन्याच्या किमतीत तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती एका लाखाच्यावर जाणार असा दावा विश्लेषकांकडून केला जात होता. दरम्यान, विश्लेषकांनी केलेला हा दावा खरा ठरला आणि 22 एप्रिल ला सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड बनवला.

मात्र हा रेकॉर्ड जास्त दिवस टिकला नाही तर फक्त 24 तासांमध्ये या मौल्यवान धातूचे तर एका लाखापेक्षा कमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 3000 रुपयांनी कमी झाली. या दिवशी सोने 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आले. नंतर यात सातत्याने घसरण होत राहिली.
24 एप्रिलला सोन्याची किंमत 98 हजार 240 रुपयांपर्यंत खाली आले. 25 एप्रिल ला सोन्याचे दर स्थिर राहिलेत. काल, 26 एप्रिल ला यामध्ये पुन्हा नॉर्मल घसरण झाली, काल सोन्याची किंमत 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली. दरम्यान आता आपण 27 एप्रिल 2025 रोजीचा सोन्याचा दर नेमका कसा आहे याचा एक आढावा घेणार आहोत.
22 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
पुणे – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
नाशिक – 90 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम
नागपूर – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
कोल्हापूर – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
लातूर – 90 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम
जळगाव – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
वसई विरार – 90 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम
ठाणे – 90 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम
भिवंडी – 90 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम
24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
पुणे – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
नाशिक – 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम
नागपूर – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
कोल्हापूर – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
लातूर – 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम
जळगाव – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
वसई विरार – 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम
ठाणे – 98 हजार 210 रुपये प्रति दहा ग्रॅम
भिवंडी – 98 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम