स्पेशल

Gold Purity Test Tips: तुम्ही सोने खरेदी करता परंतु ते खरंच शुद्ध असते का? वापरा ‘या’ सोप्या टिप्स आणि ओळखा सोन्याची शुद्धता

Published by
Ajay Patil

Gold Purity Test Tips:- सोने खरेदी ही भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर केली जाते. महिला वर्ग खास दागिने बनवण्यासाठी सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी करतात. तसेच घरामध्ये लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम राहिले किंवा सणासुदीच्या कालावधीमध्ये देखील सोन्याची खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढते.

परंतु आपण सोने खरेदी करत असताना खरंच ते सोने कितपत शुद्ध आहे हे आपल्याला माहीत नसते. कारण सोन्याच्या असलेल्या प्रचंड किमती पाहता पैसे देऊन शुद्ध सोन्याची खरेदी करणे हे खूप महत्त्वाचे असते.

त्यामुळे सोन्याची शुद्धता म्हणजेच पुरिटी चेक करून सोने खरेदी करणे गरजेचे आहे. साधारणपणे सोन्याचे शुद्धता ही हॉलमार्कच्या माध्यमातून तपासली जाऊ शकते. कारण हॉलमार्क नसलेले सोने खरेदी करू नये असे देखील सांगितले जाते. परंतु हॉलमार्क शिवाय तुम्ही इतर काही पद्धतींचा वापर करून देखील शुद्ध सोन्याची ओळख करू शकतात.

 सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी या मार्गांचा करा अवलंब

1- आम्ल चाचणी सोने शुद्ध आहे की अशुद्ध हे तपासण्याकरिता तुम्ही आम्ल म्हणजेच ऍसिड चाचणी करू शकतात. परंतु या पद्धतीची चाचणी करण्यासाठी तुम्हाला खूप प्रमाणात सावधानता बाळगणे गरजेचे असते. या पद्धतीमध्ये जी काही गोल्ड टेस्टिंग किट म्हणजे सोन्याची टेस्टिंग किट येते त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड,

नायट्रिक ऍसिड आणि ब्लॅक स्टोन इत्यादी उपलब्ध असते. या पद्धतीत दगडाने सोने घासल्यानंतर ते नंतर नायट्रिक ऍसिड चा वापर करून तपासले जाते. यामध्ये जर सोन्यावरील चिन्ह विरघळले तर ते शुद्ध सोने आहे असे समजावे.

2- फ्लोट टेस्ट सोन्याची शुद्धता तपासण्याचा हा अतिशय सोपा आणि सरळ मार्ग असून तुम्ही घरामध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची देखील शुद्धता फ्लोट टेस्टच्या माध्यमातून करू शकता. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक पाण्याने भरलेली बादली घ्यावी लागेल व त्या पाण्यामध्ये सोन्याचे दागिने टाकावे लागतील.

यामध्ये पाण्याने भरलेल्या या बादलीत जर दागिने बुडाले तर ते शुद्ध सोने आहे असे समजावे. परंतु सोने पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगत असेल तर ते कोणत्याही इतर धातूचे बनलेले आहे असे समजावे म्हणजे ते अशुद्ध आहे.

3- चुंबक चाचणी सोन्याची शुद्धता तपासण्याकरिता चुंबक चाचणी देखील एक प्रभावी उपाय आहे. कारण आपल्याला माहित आहे की सोने हा चुंबकीय गुणधर्म नसलेला धातू आहे. चुंबकासोबत सोने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही.

जर तुम्ही सोन्याच्या दागिन्याजवळ चुंबक नेले किंवा चुंबकाजवळ सोन्याचे दागिने आणले तर ते लगेच चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. म्हणजेच दागिन्यांमध्ये कोणतीही प्रतिक्रिया दिसत नाही. परंतु चुंबकाजवळ जर सोने आणले व काही प्रतिक्रिया दिसून आली तर समजावे तर ते सोने शुद्ध नाही.

Ajay Patil