नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याला झळाळी ! एका तोळ्याचा भाव ‘इतका’ वाढला; 2025 मध्ये सोन्याच्या किमती जास्तीत-जास्त किती वाढणार ?

गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता गुंतवणूकदारांचे नवीन वर्षाकडे म्हणजे 2025 कडे लक्ष लागले आहे. या नव्या वर्षात सोने आणि चांदी नेमका कोणता नवीन विक्रम स्थापित करणार, या वर्षात या मौल्यवान धातूंच्या किमती किती वाढू शकतात? याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Gold Rate Maharashtra

Gold Rate Maharashtra : गेल्या वर्षात सोने आणि चांदी खरेदी ग्राहकांना खूप मोठे धक्के मिळाले होते. या मौल्यवान धातूंच्या किमती 2024 मध्ये विक्रमी भाव पातळीवर पोहोचलेत आणि यामुळे गुंतवणूकदार अगदीच मालामाल झालेत. गुंतवणूकदारांना या मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक फायदेशीर ठरली होती कारण सरकारने सोन्या-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या वर्षी सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता गुंतवणूकदारांचे नवीन वर्षाकडे म्हणजे 2025 कडे लक्ष लागले आहे. या नव्या वर्षात सोने आणि चांदी नेमका कोणता नवीन विक्रम स्थापित करणार, या वर्षात या मौल्यवान धातूंच्या किमती किती वाढू शकतात? याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहणार आहे.

दरम्यान, नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चांदीच्या दरातही आज थोडीशी वाढ झाली आहे. MCX वर, फेब्रुवारी सोन्याचा वायदा सकाळी ११.०० वाजता ५३३ रुपयांच्या वाढीसह ७६,७९३ रुपयांवर पोहोचला, जो शेवटच्या सत्रात रु. ७६, २६० वर क्लोज झाला आणि आज रु. ७६,३५३ वर उघडला.

सोन्यापाठोपाठ चांदीही ९०,५०० रुपये प्रति किलोने महागले आहे पण सध्या उच्चांकी किंमतीवरून चांदी प्रचंड स्वस्त झाली आहे. आज देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याचे भाव वधारलेले दिसत आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ३३० रुपयांनी वाढ झालीये अन लेटेस्ट किंमत ही ७८,३३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ७१,८०० रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.

चांदीबाबत बोलायचं झालं तर ९०,५०० रुपये प्रति किलोग्रॅम या भावात आज चांदीची विक्री सुरू आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोने आणि चांदीचे दर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे जर तुम्हीही सराफा बाजाराच्या दिशेने वाटचाल करत असाल तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचून जा आणि त्यानंतरच सोने आणि चांदी खरेदी करण्याचा प्लॅन बनवा.

राज्यातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे दर

मुंबई : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,800 एवढी राहिली. तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 330 एवढी आहे.

पुणे : पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,800 प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 330 प्रति दहा ग्राम एवढी आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 330 आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 71800 प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

नागपूर : उपराजधानीत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 71800 प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,330 प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगावात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 71800 प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,330 प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

भविष्यात सोन्याच्या किमती आणखी वाढणार?

सोन्या-चांदीचे भाव यंदाही मजबूत राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोने 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 1.25 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासाकांनी वर्तवला आहे. तथापि, भू-राजकीय परिस्थिती आणि यूएस फेडरल रिझर्व्हची धोरणे किमतींवर प्रभाव टाकू शकतात. यामुळे प्रत्यक्षात यावर्षी सोन्याला काय दर मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe