Gold Rate Today : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरणीचा ट्रेंड दिसून आला आहे. या मौल्यवान धातूच्या किमती एका लाखाच्या पार गेल्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या किमती कमी होत आहेत. यामुळे साहजिकच सर्वसामान्य ग्राहकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे या घसरणीचा गुंतवणूकदारांना थोडा फटका बसण्याची शक्यता आहे.
खरे तर एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एका लाखाच्या पार गेली होती. 22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली होती. यानंतर सोन्याच्या किमती चक्क 93 हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली आहे.

13 जून 2025 रोजी या मौल्यवान धातूची किंमत एक लाख एक हजार चारशे रुपये इतकी नमूद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी अर्थातच 14 जून 2025 रोजी पुन्हा या मौल्यवान धातूची किंमत वाढली. या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 680 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
पंधरा तारखेला किंमत स्थिर राहिली मात्र काल अर्थात 16 जून 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घसरन झाली. मिळालेल्या माहितीनुसार 16 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 150 रुपयांची आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 170 रुपयांची घसरण झाली. अशा परिस्थितीत आता आपण 17 जून 2025 रोजी चे 10 ग्रॅम चे रेट जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट
मुंबई : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.
जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.