स्पेशल

Gold rates : सोन्याची किंमतीत आजही बदल, वाचा आजचे दर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  आज भारतात सोने चांदीची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर वेगळ्या असतात.

काय आहे आज सोन्याचा दर? मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47360 रुपये आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत 48360 प्रति 10 ग्रॅम आहे.

दरम्यान पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46500 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49780 रुपये आहे. मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर जाणून घ्या दर – तुम्ही घरी बसल्या बसल्या सोन्या-चांदीची किंमत सहज जाणून घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. येथे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची- तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे.

‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office