अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- आज शनिवारी सोन्याचा भाव 10 ग्रॅम सोने (24-कॅरेट) 49,100 रुपये आणि 10 ग्रॅम सोने (22-कॅरेट) 48,100 रुपये विकले गेले. चांदीच्या दरात मात्र 1 किलोमागे 300 रुपयांनी घट झाली असून, 66,000 रुपये किलोने विकली गेली.
विविध मेट्रो सिटीमध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर यामुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज डेटामधील अलीकडील ट्रेंडनुसार , सोन्याच्या फ्युचर्सचे मूल्य 0.40 टक्क्यांनी घसरून 48,864.00 रुपये झाले.
आणि, चांदीच्या फ्युचर्समध्येही 0.53 टक्क्यांनी घसरण होऊन ती 65,620.00 रुपयांवर स्थिरावली. प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा भाव दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,530 रुपये, तर मुंबईत सोन्याचा दर 49,100 रुपये आहे.
दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव अनुक्रमे 48,150 रुपये आणि 48,100 रुपये आहे. चेन्नईमध्ये शनिवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,500 होती, तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने हे 46,290 रुपयांना विकले जात आहे.
कोलकाता येथे 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,200 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,500 रुपये आहे. बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,180 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रूपये आहे.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव गेल्या 24 तासात 10 रुपयांनी कमी झाला आहे. 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 50,740 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 46,150 रुपये आहे.
प्रमुख शहरांमध्ये चांदीची किंमत चेन्नईमध्ये शनिवारी 1 किलो चांदीची किंमत 70,700 रुपये होती , तर दिल्ली आणि मुंबईमध्ये, 66,000 रुपये आहे.
कोलकाता आणि बंगळुरूमध्ये चांदीचा भाव 1 किलोसाठी 66,000 रुपये आहे, तर हैदराबादमध्ये 1 किलो चांदीचा भाव 70,700 रूपये आहे.