स्पेशल

Poultry Farm Loan : स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करण्याची सुवर्णसंधी! सरकार ‘या’ योजनेअंतर्गत देत आहे 10 लाख पर्यंत अनुदान

Published by
Ajay Patil

Poultry Farm Loan :- शेतीला जोडधंदे म्हणून मोठ्या प्रमाणावर पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय बऱ्याच वर्षापासून केली जातात.परंतु आता या व्यवसायांना शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून करत असून

यामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करून मोठे मोठे शेड उभारून हे व्यवसाय आता शेतकरी करतात. या जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत देखील अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनेच्या सहाय्याने अशा जोडधंद्यांना प्रोत्साहन देऊन बेरोजगारी कमी करण्याच्या उद्दिष्टाने खूप महत्त्वपूर्ण आहे. याच पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे व हा व्यवसाय सुरू करता यावा याकरिता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजना हे होय.

कसे आहे महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचे स्वरूप?

या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कुक्कुटपालनाकरिता कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत करते. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही कर्ज योजना सुरू करण्यात आलेली असून पोल्ट्री व्यवसायाला या माध्यमातून आर्थिक मदत सरकार करत असते.

या कर्ज योजनेअंतर्गत कुक्कुटपालनाकरिता कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्म उभारण्याकरिता बँकांकडून कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून बँकामार्फत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे हे कर्ज परतफेड करण्याचा कालावधी पाच ते दहा वर्षाच्या आसपास आहे. त्यामुळे तुम्हाला देखील या कर्ज योजनेचा फायदा मिळवून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नजीकच्या बँक शाखेमध्ये जाऊन या योजनेकरिता अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र, व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेचे स्टेटमेंटचा फोटो, पोल्ट्री फार्म व्यवसाय परवाना, पक्षांसाठी आवश्यक पिंजरा तसेच उपकरणे व पक्षी खरेदीचे दिले, ॲनिमल केअर मानकांकडून परवानगी, विमा पॉलिसी तसेच मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतात.

अशाप्रकारे करू शकता अर्ज

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल व त्या ठिकाणाहून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

2- अर्ज मिळाल्यानंतर सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.

3- ही माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे.

4- त्यानंतर तुमचा फोटो फार्म मध्ये टाकावा लागेल आणि त्यावर सही करावी.

5- आता हा अर्ज आणि कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावीत व सबमिट केलेल्या फॉर्मची बँकेकडून छाननी केली जाते.

6- सर्व कागदपत्रे बरोबर आढळल्यास तुम्हाला या योजनेचा फायदा मिळतो.

Ajay Patil