स्पेशल

7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्या व भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवा! भारतीय रेल्वेने आणली स्वस्तात ज्योतिर्लिंग दर्शनाची संधी, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

पर्यटनामध्ये निसर्ग पर्यटनाला जितके महत्त्व आहेत तितकेच अनेक भाविक हे धार्मिक पर्यटना देखील तितकेच महत्त्व देतात. धार्मिक पर्यटन करण्याच्या दृष्टिकोनातून भारतातील अनेक  अध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात व एवढेच नाही तर धार्मिक पर्यटनासाठी अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लॅनिंग देखील करत असतात.

उदाहरणच घ्यायचे झाले तर भारतामध्ये ज्या प्रकारे केदारनाथ यात्रेला गर्दी होते तसेच गर्दी  ही भारतातील इतर धार्मिक स्थळांच्या  ठिकाणी देखील आपल्याला दिसून येते. धार्मिक पर्यटनामध्ये जर आपण पाहिले तर ज्योतिर्लिंग दर्शनाला देखील खूप महत्त्व आहे.

बरेच व्यक्ती हे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्लॅनिंग करत असतात व कुटुंबासोबत  याकरिता ट्रिप देखील प्लान करतात. अशा पद्धतीने जर तुमचे देखील कुटुंबासमवेत ज्योतिर्लिंग दर्शनाला जायची इच्छा असेल तर भारतीय रेल्वेने खास पॅकेजेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

याकरिता भारतीय रेल्वेच्या अंतर्गत आयआरसीटीसीने खास भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली असून या अंतर्गत भाविकांना सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे.

 भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग दर्शनाची सुवर्णसंधी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आयआरसीटीसीच्या अंतर्गत भाविकांसाठी भारत गौरव विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत भाविकांना सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंगसह इतर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे.

भारतीय रेल्वेचा हा प्रवास राजस्थानातील जयपूर येथून सुरू होणार असून भारत गौरव ट्रेन एक जून 2024 पासून जयपूर येथून सात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी प्रवासाला सुरुवात करणार आहे.

हे पॅकेज दहा रात्री आणि अकरा दिवसांचे असणार असून जयपुर रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त प्रवासी अजमेर, भीलवाडा तसेच चित्तोडगढ आणि उदयपूर स्टेशनवरून देखील चढू आणि उतरू शकणार आहेत.

 किती आहे या पॅकेजेची किंमत?

आयआरसीटीसीने याकरिता टूर पॅकेज निश्चित केले असून याकरिता पैसे म्हणजेच तिकीट दर हे प्रवाशांनी निवडलेल्या पर्याय कोणत्या आहेत त्यावर अवलंबून असणार आहे.

साधारणपणे हे पॅकेज 26630 रुपये प्रति व्यक्तीपासून सुरू होईल. कम्फर्ट क्लास मध्ये डबल/ ट्रिपल अक्यूपेन्सी करिता प्रतिव्यक्ती खर्च 26 हजार 630 रुपये आहे तर स्टॅंडर्ड वर्गामध्ये डबल/ ट्रिपल ऑक्युपॅन्सी करिता प्रतिव्यक्ती खर्च 31 हजार पाचशे रुपये आहे.

 या ज्योतिर्लिंगांचे घेता येणार दर्शन

या पॅकेज अंतर्गत गुजरात मधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, द्वारका येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर पुणे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औरंगाबाद आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर उज्जैन यांचा यामध्ये समावेश आहे.

 कशी कराल बुकिंग?

या पॅकेजेची बुकिंग व अधिक माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसीचे वेबसाईट irctctourism.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात व अधिकची माहिती देखील घेऊ शकतात.

Ajay Patil