स्पेशल

मारुतीच्या ‘या’ कारचे नवीन व्हेरियंट झाले 34 हजार रुपयांनी स्वस्त! मारुतीने लॉन्च केले या कारचे नवीन स्टाईलिश व्हेरियंट

Published by
Ajay Patil

भारतातील कार बाजारपेठेमध्ये कंपन्या पहिल्या तर यामध्ये मारुती सुझुकी हे नाव विशेष लोकप्रिय असून भारतातच नाही तर संपूर्ण जगात मारुती सुझुकीच्या कार रस्त्यावर धावताना दिसतात. कित्येक वर्षापासून ग्राहकांच्या सेवेशी ही कंपनी असून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा परवडणाऱ्या दरात या कंपनीने बाजारपेठेमध्ये कार लॉन्च केलेले आहेत.

कमी किमतींमध्ये चांगलीत चांगली वैशिष्ट्ये देण्यावर या कंपनीचा भर असतो.याच मुद्द्याला धरून जर आपण मारुती सुझुकी इंडियाच्या इग्नीस या कारचा विचार केला तर कंपनीच्या माध्यमातून या कारचे नवीन रेडियन्स एडिशन लॉन्च केले असून ही कार अधिक स्टायलिश आणि प्रगत अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही कार अगदी कमीत कमी किमतीमध्ये लॉन्च केलेली आहे.

 मारुती सुझुकीने लॉन्च केले इग्नीसचे नवीन रेडियन्स एडिशन

मारुती सुझुकीच्या माध्यमातून एसयूव्ही द्वारे प्रेरित डिझाईन असलेली इग्निस ही कार 2017 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रथम लॉन्च करण्यात आलेली होती व तेव्हापासून तब्बल दोन लाख आठ हजार पेक्षा जास्त युनिटची विक्री करण्यात आलेली आहे. याच कारच्या आता हे नवीन व्हेरियंट कंपनीने बाजारपेठेत आणले असून त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत व मुळे हे नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा चांगले दिसते.

त्यामध्ये या कारची बाह्य डिझाईन तसेच प्रीमियम इंटिरियर आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. मारुती सुझुकीने मात्र या कारमध्ये टेक्निकली म्हणजेच यांत्रिकपणे कुठलाही प्रकारचा बदल केलेला नाही. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन दिले असून जे 83 पीएस पावर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते.

हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सह जोडलेले असून कंपनी मायलेज बद्दल दावा करते की ही कार 20.89 किलोमीटर पर लिटर मायलेज देते व यात 260 लिटरची बूट स्पेस आहे.हे जे आपण वैशिष्ट्ये पाहिली ही जुन्या इग्निसमध्ये देण्यात आलेली आहे

व आता नवीन रेडियन्स एडिशनमध्ये देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांबद्दल पाहिले तर त्यामध्ये एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, पुश स्टार्ट/ पुश स्टॉप बटन देण्यात आलेले आहेत तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्रायव्हर सीट हाईट एडजेस्टर, स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स, मल्टी फंक्शन डिस्प्ले इत्यादीसह सात इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आलेली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये डुएल फ्रंट एअरबॅग, मागील पार्किंग कॅमेरा तसेच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, इबिडी अर्थात इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स वितरण व अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सह मागील पार्किंग सेंन्सर देखील देण्यात आलेले आहेत.

 किती आहे इग्निसच्या या नवीन रेडियन्स व्हेरियंटची किंमत?

मारुती सुझुकीने हे नवीन रेडियन्स एडिशन कमीत कमी किमतीमध्ये लॉन्च केले असून त्याची एक्स शोरूम किंमत पाच लाख 49 हजार रुपये आहे. जर आपण इग्निस या कारच्या नियमित मॉडेलच्या सिग्मा व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती पाच लाख 84 हजार रुपये आहे. यावरून आपल्याला दिसून येते की इग्निसचे हे नवीन व्हेरियंट तब्बल 34 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Ajay Patil