अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनामुळे ऑटोसह अनेक सेक्टर्सची अवस्था बिकट आहे.त्यामुळै कंपन्या विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना अनेक सवलती देत आहेत. मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रियp सवलतीची घोषणा केली आहे.
दिल्लीत मारुती सुझुकी अल्टोची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. परंतु ही कार केवळ 2.60 लाखांमध्ये मिळू शकते. परंतु ही ऑफर केवळ 30 जूनपर्यंत आहे.
मारुती ग्राहकांना जून महिन्यात वाहन खरेदीवर 20,000 रुपयांची रोख सूट आणि 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे, जर तुम्ही कॉर्पोरेट अंतर्गत बुकिंग केले तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल.
याद्वारे तुम्ही 3900 रुपये वाचवू शकता. तुम्हाला मारुतीची ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे फक्त 30 जूनपर्यंत वेळ असेल. कंपनीने 30 जूनपर्यंत ही ऑफर ठेवली आहे.
त्याच वेळी, ही ऑफर वेगवेगळे डीलर्स आणि वेगवेगळ्या व्हेरिएंट्सवर देखील अवलंबून असेल. याशिवाय या ऑफरअंतर्गत तुम्ही कारचं बुकिंग केल्यास तुम्हाला बुकिंग बोनसचा लाभही मिळू शकेल.
या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत या कारची एक्स शो रूम किंमत 2,99,800 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर या कारच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 4,48,200 रुपये इतकी आहे.