स्पेशल

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी गुड न्युज! FD व्याजदर वाढलेत, नवीन दर आताच चेक करा

Published by
Ahmednagarlive24 Office

Bank Of Badoda FD News : उद्या गणेशोत्सवाचा पर्व सुरु होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात मोठे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर बँक ऑफ बडोदा च्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंद वार्ता समोर आली आहे.

एफडी करू इच्छिणाऱ्यांना बँकेने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एक मोठी भेट दिली आहे. खरेतर, अलीकडे आपल्या देशात एफडी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे एफ डी व्याजदरात चांगली सुधारणा झाली आहे. हेच कारण आहे की आता महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये आपला पैसा गुंतवत आहे.

आधीच्या तुलनेत एफडी करणाऱ्यांना अधिकचा परतावा दिला जात असल्याने महिला वर्ग सोन्या ऐवजी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवत आहे. स्मॉल फायनान्स बँक तर आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर विक्रमी व्याजदर ऑफर करत आहेत यात शंकाच नाही. मात्र अलीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

देशातील बड्या सरकारी बँकांमध्ये समाविष्ट असलेल्या बँक ऑफ बडोदाने सुद्धा आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. BOB बँकेने काही ठराविक कालावधीच्या FD वरील व्याज 0.10 ते 0.25 टक्के वाढवले आहे.
कोणत्या कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ केली.

बँक बडोदा ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 211 दिवस ते 270 दिवस कालावधीच्या एफ डी वरील व्याजदर सुधारित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे नवीन रेट कालपासूनच लागू झाले आहेत. अर्थातच येत्या काही दिवसांनी बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करणाऱ्यांना आता अधिकचा परतावा मिळू शकणार आहे.

211 दिवस ते 270 दिवस कालावधीच्या एफडी व्याजदरात एसबीआय ने 0.10 टक्के ते 0.25 टक्क्यांपर्यंत ची वाढ केली आहे. यानुसार या कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.25% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 6.75 टक्के या रेटने व्याज दिले जाणार आहे. दरम्यान बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कमाल 7.80 टक्के व्याज ऑफर केले जात आहे.

बँक ऑफ बडोदा 399 कालावधीच्या स्पेशल एफ डी वर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. या मान्सून धमाका डिपॉझिट स्कीमवर बँक ऑफ बडोदा कडून आपल्या सामान्य ग्राहकांना 7.30% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.80% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.

ही बँक ऑफ बडोदा ची सर्वाधिक व्याज ऑफर करणारी एफडी योजना आहे. मात्र ही एक विशेष एफडी स्कीम आहे. म्हणजे ही योजना काही लिमिटेड कालावधीसाठीचं सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेच्या 399 कालावधीच्या स्पेशल एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करायची असेल तर लवकरात लवकर तुम्हाला यामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office