खुशखबर ! दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

खरतर दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal भारतात इंजिनिअर्सची भरती करणार आहे. ही भरती कंपनीच्या बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद येथील इंडिया डेव्हलपमेंट सेंटर्ससाठी होईल.

यासाठी एक हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची भरती केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येतंय. सध्या या तीन शहरांतील इंडिया टेक्नॉलॉजी सेंटर्समध्ये 4.5 हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.

ही भरती याच वर्षी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बराच काळ रखडलेल्या नोकरीच्या शोधार्त असणाऱ्यांसाठी ही एक खुशखबर आहे.

कोणत्या जागेंवर भरती ? :- डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये सॉफ्टवेअर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, रिस्क एनालिटिक्स, बिजनेस एनालिटिक्स, एंट्री, मिड-लेवल आणि सीनियर रोल्स

कशी होणार भरती ? :- देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24