अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- टाटा टियागो 2016 मध्ये लाँच करण्यात आलेली कार आहे. लाँचिंगपासूनही टाटाच्या लाईनअपमध्ये ही एक मजबूत आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे.
नुकतेच टाटा मोटर्सने टियागो लिमिटेड एडिशन कार गेल्या महिन्यात 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या प्राईस टॅगसह सादर केली होती. ही हॅचबॅक कार आता टाटाच्या डीलरशिप्सकडे दिसू लागली आहे.
हे लिमिटेड एडिशन मॉडल डेटोना ग्रे रंगात पाहायला मिळू शकतं. याशिवाय गाडी दोन रंगांमध्ये सादर केली जाऊ शकते. ज्यामध्ये फ्लेम रेड आणि पर्लसेंट व्हाईट या रंगांचा समावेश आहे. लिमिटेड एडिशन टियॅगोमध्ये 14 इंचांचे एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
जाणून घ्या TATA Tiago चे आकर्षक फीचर्स रेग्युलर ट्रिमशिवाय Tiago लिमिटेड एडिशनमध्ये रियर पार्सल ट्रे आणि वॉईस कमांड सिस्टिमसह पाच इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
अडंर द हुड गाडीत 1.2 लीटरचं रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. याची मोटर 5 स्पीड मॅनुअल युनिटद्वारे जबरदस्त पॉवर देते. नवीन टियागो लिमिटेड एडिशनच्या लाँचिंगबाबत बोलताना टाटा मोटर्सचे मार्केटिंग हेड,
विवेक श्रीवत्स म्हणाले की, “2016 मध्ये लाँच झाल्यानंतर टियागो ही कार तिच्या सेगमेंटमध्ये एक यशस्वी कार ठरली आहे.
तसेच ही कार सातत्याने लोकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. आम्हाला विश्वास आहे की, टियागोच्या लिमिटेड एडिशन वेरिएंटची सुरुवात आणि आमच्या न्यू फॉरएव्हर फिलॉसफीसह आम्ही सातत्याने ग्राहकांच्या पसंतीत उतरतील असे मॉडल्स लाँच करत राहू.