Goregaon-Mulund Link Road : सध्या महाराष्ट्रात रस्ते विकास आणि पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी शासन प्रशासनाने कंबर कसली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित देशाच्या विकासात तेथील रस्ते आणि पायाभूत सुविधा गेम चेंजर सिद्ध होत असतात. हेच कारण आहे की राज्यात सध्या वेगवेगळ्या महामार्गांचे, समुद्री पूलांचे, भुयारी मार्गांचे कामे हाती घेण्यात आले आहेत.
मुंबई महानगर मध्ये देखील वेगवेगळी विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड या दोन प्रोजेक्टचा देखील समावेश होतो. दरम्यान आता गोरेगाव मुलुंड लिंक रोड बाबत एक मोठ अपडेट हाती आला आहे. खरं पाहता या लिंक रोडचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आज आपण या लिंक रोडची खासियत जाणून घेणार आहोत.
खरं पाहता हा गोरेगाव मुलुंड लिंक रोड मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लिंक रोड मुळे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर दरम्यान प्रवास करणे अजूनच सोयीचे होणार आहे. यामुळे या दोन्ही दिशांच्या उपनगरातील प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यामुळे उपनगरातील वाहतूक जलद गतीने होणार असून उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रोजेक्टचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे याच्या अंतर्गत संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये उभारला जाणारा बोगदा आहे. हा बोगदा या नॅशनल पार्क मध्ये जमिनीपासून 25 ते 200 मीटर खालून जाणार असल्याने हा भुयारी मार्ग सध्या चांगला चर्चेचा विषय ठरत आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड बाबत थोडक्यात
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा गोरेगाव मुलुंड लिंक रोड 12.20 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. तसेच या प्रकल्पाची रुंदी ही 45.70 मीटर एवढी राहणार आहे. या प्रकल्पच्या बांधकामासाठी 8 हजार 137 कोटी रुपयाचा खर्च होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे बीएमसी आयुक्त आयएस चहल यांनी 2022-23 या वर्षाच्या अर्थसंकल्पात या मुंबई महानगरासाठी महत्त्वाकांक्षी अशा प्रोजेक्टसाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे. सद्यस्थितीला पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरादरम्यान प्रवास करण्यासाठी एक तासांचा कालावधी लागतो मात्र हा लिंक रोड तयार झाल्यानंतर हा कालावधी 15 मिनिटांवर येणार आहे. म्हणजेच उपनगरांमधील प्रवास जलद गतीने होणार आहे. यामुळे कुठे ना कुठे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यश मिळणार आहे. हा लिंक रोड ऐरोली रोडद्वारे नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला आणि कल्याण – डोंबिवलीला जोडला जाणार असल्याने संबंधित भागातील प्रवास जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोडची विशेषता
या प्रकल्पांतर्गत पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील रत्नागिरी चौकात उड्डाणपूल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे सदर उड्डाणपूल हा सहा लेनचा राहणार आहे. यामुळे या उड्डाणपुलावर वाहतूक जलद गतीने होईल. वाहतूक कोंडी निस्तारण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे.
तसेच या लिंक रोडच्या माध्यमातून गोरेगाव फिल्मसिटीमध्ये देखील 1.6 Km लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. याशिवाय या लिंक रोड मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली 4.7 किमी लांबीचे 13 मीटर व्यासाचे दोन बोगदे देखील तयार केले जाणार आहेत. हे बोगदे या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य राहणार आहेत. या बोगद्यांमुळेच हार लिंक रोड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
तसेच या प्रोजेक्टमध्ये वाहतूक समस्या सोडविण्यासाठी भांडुपच्या डॉ. हेडगेवार चौकात देखील उड्डाणपूल उभारला जाणार असून. सदर उड्डाणपूल हा सहा लेनचा राहणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार हा लिंक रोड प्रकल्प एकूण चार टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाचे रुंदीकरण केलं जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचे रुंदीकरण केलं जाणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात विविध चौकांमध्ये उड्डाणपूलची उभारणी केली जाणार आहे.
याशिवाय या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यात पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गाच्या चौकात उड्डाणपूल आणि बोगदे बांधले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या लिंक रोड अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी 1666.06 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान या ठिकाणी एक गोष्ट विशेष ती म्हणजे गोरेगाव – मुलुंड लिंक रोड हा पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा पहिला प्रोजेक्ट नसून या आधी असे तीन प्रकल्प झाले आहेत. म्हणजे हा चौथा लिंक रोड राहणार आहे.
दरम्यान नॅशनल पार्कमध्ये या प्रोजेक्ट अंतर्गत बोगदे उभारले जाणार असल्याने त्या ठिकाणी असलेले प्राणी आणि झाडांना इजा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जमिनीपासून 200 मीटर खाली बोगदा उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
दरम्यान या प्रोजेक्टसाठी पश्चिम उपनगरात एक आणि पूर्व उपनगरात एक अशा दोन उड्डाणपुलांचे काम देखील सुरू करण्यात आले असण्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पूर्व उपनगरांतर्गत भांडुपमध्ये बांधण्यात येणाऱ्या डॉ. हेडगेवार जंक्शन चौक उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले असून या प्रकल्पांतर्गत देशातील सर्वात जाड व्यासाचा आणि सर्वात खोल बोगदा पूर्ण केला जाणार आहे.
दरम्यान आता या प्रकल्पाच्या कामाला गती लाभली आहे. खरं पाहता, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संलग्न असलेल्या प्रादेशिक अधिकार प्राप्त समिती म्हणजे REC ने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावे 19.43 हेक्टर राखीव वनजमीन वळवण्यासाठी 12 Km गोरेगाव मुलुंड लिंक रोड च्या बाजूने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली 3 + 3 लेन बोगद्याच्या बांधकामासाठी ‘तत्त्वतः’ मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान REC ने अंतिम मंजुरी देण्यासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त माहिती देखील मागवली आहे.
तसेच या प्रकल्पासाठी नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ अँड इको-सेन्सिटिव्ह झोनकडून मंजुरी मिळवणं आवश्यक होतं. दरम्यान ही मंजुरी आधीच घेण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचा असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी बीएमसीने बांधकाम सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. फेब्रुवारी 2023 पासून बांधकाम सुरू होणार आहे. म्हणजेच पुढील महिन्यात बांधकाम सुरू होईल आणि डिसेंबर 2026 पर्यंत हे बांधकाम पूर्ण केल जाणार आहे. एकंदरीत 2026 नंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.