Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विजयादशमीच्या आधीच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या 11 लाख कर्मचाऱ्यांना बोनस ची घोषणा केली आहे. या सदर नोकरदार मंडळींना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे.
दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुढील आठवड्यात केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याची बातमी समोर आली आहे.
दिवाळीच्या आधीच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे. हा फॅक्टर वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 26 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार 18 हजार रुपये एवढा आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के दराने पगार दिला जात आहे.
पण आता हा फॅक्टर 3.68 टक्के करण्याची सरकारची योजना आहे. सरकारने याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु पुढील आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
जर समजा सरकारने ही घोषणा केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार आठ हजार रुपयांनी वाढणार आहे. अर्थातच किमान मूळ पगार 18000 वरून 26000 होणार आहे. मूळ पगार वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना याच आधारावर महागाई भत्ताही मिळणार आहे.
त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही या सरकारी नोकरदार मंडळी साठी एक मोठी भेट ठरणार आहे.
महागाई भत्ता ही वाढणार
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र हा महागाई भत्ता लवकरच आणखी तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच महागाई भत्ता 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांनी होईल अशी आशा आहे.
याबाबतचा निर्णय झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लाभ मिळणार आहे. मात्र ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.