स्पेशल

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार का ? नियम काय सांगतात

Published by
Tejas B Shelar

Government Employee News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काही पेन्शन योजना देखील सुरू करण्यात आल्यात.

अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक फिक्स पेन्शन उपलब्ध करून दिली जाते. यासाठी मात्र सुरुवातीला काही गुंतवणूक करावी लागते. यामध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिक गुंतवणूक करण्यास पात्र असतात.

जर समजा एखाद्या नागरिकाने त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याला प्रत्येक महिन्याला 210 रुपये जमा करावे लागणार आहेत. अठराव्या वर्षी प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवले तर 5000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

जर एखाद्याने वयाच्या 40 व्या वर्षी योजनेत गुंतवणूक केली तर गुंतवणूक करणाऱ्याला दरमहा 1454 रुपये जमा करावे लागणार आहेत, एवढे पैसे गुंतवल्यास गुंतवणूकदाराला वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर 5000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

या योजनेतून पेन्शन मिळवण्यासाठी मात्र किमान 20 वर्ष सतत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये देशातील करोडो लोकांनी गुंतवणूक केली आहे. अनेक जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून या योजनेमुळे गुंतवणूक करणाऱ्यांनावयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून दिली जात आहे.

ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता या योजनेला 9 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. पण अजूनही या योजनेबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांकडून देखील या योजनेबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार की नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहे. दरम्यान आता आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.

सरकारी कर्मचाऱ्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार का?
भारत सरकारने सुरू केलेली अटल पेन्शन योजना साऱ्यांसाठी आहे. अर्थातच भारतातील कोणताही नागरिक यासाठी अर्ज करू शकतो आणि यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

सरकारी कर्मचारी देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करून पेन्शन साठी पात्र ठरणार आहेत. मात्र यामध्ये फक्त आणि फक्त भारतीय नागरिकच गुंतवणूक करू शकतात.

यामध्ये 18 ते 40 वर्ष वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय नागरिकांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे म्हणजे नेट बँकिंगद्वारे कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजनेत खाते उघडू शकते. भारतीय नागरिक त्यांच्या बँकेच्या शाखेत जाऊन अटल पेन्शन योजनेत खाते उघडू शकतात.

पण, सरकारी कर्मचारी EPF आणि EPS योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्थातच सरकारी कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात मात्र EPF आणि EPS योजनांचा लाभ घेणाऱ्यांना याचा फायदा घेता येणार नाही.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar