Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा भत्ते प्रोव्हाइड केले जातात. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही नियम देखील शासनाकडून निर्धारित असतात. या नियमांचे पालन सरकारी कर्मचाऱ्यांना करणे आवश्यक असते. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वेतन, तसेच इतर अनेक सवलती अनुज्ञय असतात.
यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यासही त्यांच्या कुटुंबांना वेगवेगळे लाभ शासनाच्या माध्यमातून दिले जातात. त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने काही नियम देखील लावून दिले आहेत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग; राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !
यामध्येच सेवा समाप्तीचा नियम देखील महत्त्वाचा आहे. जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याने भारतीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये नमूद करण्यात आलेल्या कालावधीपर्यंत सलग रजा घेतली तर अशा कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती म्हणजेच कार्यमुक्त केले जाते. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा सरकारी सेवेत घेता येत नाही.
या परिस्थितीत आज आपण भारतीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये नेमकी किती दिवसाची रजा घेतली तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती मिळत असते किंवा कार्यमुक्त केलं जातं याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. आणि आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी भारतीय नागरी सेवा नियम 1972 हा कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या बाबतीत वेगवेगळे प्रावधान आहेत. यामध्ये सेवा समाप्तीचे देखील कलम आहे.
हे पण वाचा :- ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड, पहा संपूर्ण जाहिरात
या सेवा समाप्तीच्या नियमानुसार जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याने सलग पाच वर्ष सुट्टी घेतली तर अशा सरकारी कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केले जाते किंवा त्याची सेवा समाप्त होत असते. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा शासकीय सेवेत त्या पदावर बहाल केले जात नाही. म्हणजेच या नियमा अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षे रजा मिळत नाही.
मात्र यामध्ये परदेश सेवा अपवाद ठेवण्यात आली आहे. मात्र इतर कर्मचाऱ्यांना सलग पाच वर्षाची रजा मंजूर होत नाही. तरीही जर एखादा कर्मचारी सलग पाच वर्ष सुट्टीवर असेल तर त्याला आपोआप कार्यमुक्त या नियमाच्या माध्यमातून केल जात.
हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार; ‘इतका’ वाढणार DA, पहा पगारात किती वाढ होणार?