Government Employee News : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय अर्थसंकल्पाच्या चर्चा रंगल्या आहेत. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी यंदाचा हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. म्हणजेच अवघ्या आठ दिवसावर यंदाचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे.
दरम्यान एका मीडिया रिपोर्ट नुसार या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या हाऊस बिल्डिंग अलाउन्स ऍडव्हान्स मध्ये वाढ होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला हाऊस बिल्डिंग अलाउन्स ऍडव्हान्स अर्थातच एच बी ए सरकारी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयेपर्यंत मिळते.
मात्र आता यावर मोठा निर्णय होणार असून एच बी ए मध्ये पाच लाखाची वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना एचबीए म्हणून तीस लाख रुपये पर्यंत रक्कम सरकारकडून दिली जाऊ शकणार आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.
मात्र या घर बांधणी भत्तावर कारल्या जाणाऱ्या व्यासात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात फायदा पण होईल आणि अधिक व्याज देखील द्यावं लागणार आहे. खरं पाहता सध्या घर बांधणी बत्त्यावरील व्याजदर 7.1% आहे.
मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात यामध्ये 7.5% एवढं व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन एचबीएचा व्याजदर 7.5% पर्यंत सुधारित करू शकतात आणि आगाऊ मर्यादा सध्याच्या 25 लाख रुपयांवरून 30 लाखांपर्यंत वाढवू शकतात.खरं पाहता, एचबीएच्या रकमेत वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल मात्र त्यावरील व्याज आकारणी दर वाढवला जाण्याचीही शक्यता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घर बांधणे महागात पडणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या HBA भत्यासंदर्भात थोडीशी दिलासादायक आणि थोडीशी चिंताजनक अशी ही बाब राहणार आहे.