Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी संस्थेमध्ये काही रिक्त जागांसाठी नुकतेच भरती काढण्यात आली आहे.
याची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे.
निश्चितच ज्या व्यक्तींना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आज आपण या पदभरतीच्या माध्यमातून कोणत्या रिक्त पदांसाठी भरती होणार आहे, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय राहील, यासाठी अर्ज कसा करावा लागेल, अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक कोणती? यासारख्या एक ना अनेक बाबी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती
या अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार, ज्युनिअर इंजिनियर, एक्झिक्यूटिव्ह आणि ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती रिक्त जागांसाठी होणार भरती?
अधिसूचनेनुसार या सरकारी संस्थेत ज्यूनिअर इंजिनीअरच्या 353 जागा आणि एक्झिकेटिव्ह, ज्यूनिअर एक्झिकेटिव्हच्या 181 जागा अशा एकूण 534 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
संबंधित विषयातील इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली तसेच डिप्लोमा धारक उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत. मात्र याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.
हे पण वाचा :- शेवटी तारीख जाहीर झालीच; ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल, SMS करूनही पाहता येणार निकाल, वाचा….
अर्ज कसा करावा लागणार आहे?
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. dfccil.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज सादर करण्याच्या पद्धतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक?
या पदासाठी 20 मे 2023 पासून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून 19 जून 2023 पर्यंत इच्छुक व्यक्तींना आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे. विहित कालावधीमध्ये मात्र इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही याची दक्षता उमेदवाराने घेणे अपेक्षित आहे.