Government Saving Scheme : आम्ही जर तुम्हाला पाच लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दहा लाख रुपये मिळतील म्हणजेच पाच लाख रुपयांचा निव्वळ फायदा होईल असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का ? कदाचित नाही. पण, सरकारकडून अशा काही बचत योजना राबवल्या जात आहेत ज्यामधून गुंतवणूकदारांना चक्क डबलचा फायदा होत आहे.
मात्र, या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही काळ संयम ठेवावा लागतो. दीर्घ कालावधीसाठी सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकतो. दरम्यान, आज आपण अशाच एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या सरकारी बचत योजनेची माहिती पाहणार आहोत त्या बचत योजनेचे नाव किसान विकास पत्र असे आहे. पोस्ट ऑफिस कडून ऑफर केली जाणारी ही सरकारी बचत योजना गुंतवणूकदारांमध्ये अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. आज आपण याच बचत योजनेच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कशी आहे किसान विकास पत्र योजना ?
किसान विकास पत्र योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला दहा लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे पण या योजनेत सर्वजण गुंतवणूक करू शकतात.
म्हणजेच ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी नाहीये. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते. एवढेच नाही तर नाबालिक म्हणजेच दहा वर्षांपेक्षा अधिक आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या नावे त्यांचे पालक अकाउंट ओपन करू शकतात.
सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. या व्याज दराने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट होतात.
5 लाखाचे 10 लाख कधी होणार
जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी नंतर त्याला दहा लाख रुपये मिळणार आहेत. 115 महिन्यांनी ही योजना मॅच्युअर होते. म्हणजेच गुंतवणूक केल्यानंतर 115 महिन्यांनी गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट होणार आहेत.
जर तुम्ही यामध्ये पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 115 महिन्यांनी दहा लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये पाच लाख रुपये तुमची गुंतवणूक आणि पाच लाख रुपये निव्वळ व्याज राहणार आहे.