Government Scheme For Women : केंद्र आणि राज्य शासन सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच नवनवीन उपक्रम राबवते. अशा नवनवीन उपक्रमांच्या तसेच योजनांच्या माध्यमातून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाचा असतो. प्रामुख्याने महिला, विद्यार्थी, शेतमजूर, असंघटित कामगार आणि शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
यामध्ये महिलांसाठी केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून देखील वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. काही योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. केंद्राने 2017 मध्ये अशीच एक अभूतपूर्व आणि कौतुकास्पद अशी महिला हिताची योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांना 6 हजाराचा लाभ दिला जातो. दरम्यान आज आपण नेमकी ही योजना काय आहे? या योजनेचे स्वरूप नेमके काय? कोणत्या महिलांना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळतात? कोणत्या महिला यासाठी पात्र राहतात? याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात आणि तपशीलवार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- मराठमोळ्या शेतकऱ्याचा मिश्र शेतीचा प्रयोग यशस्वी; एकाच जमिनीत केली शेवगा, वांगी आणि कांदापात लागवड, पहा हा भन्नाट प्रयोग
कोणती आहे ही योजना
खरं पाहता, भारतीय संस्कृतीत महिलेला अभूतपूर्व असं स्थान देण्यात आले आहे. नारी ही देवीचे रूप अशा आपल्या संस्कृतीत म्हटले जाते. हेच कारण आहे की महिला सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी शासनाकडून वेगवेगळे योजना सुरू करण्यात आल्या आहेत. महिलेचा मानसन्मान उंचावण्यासाठी राज्य शासनाने देखील वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत.
केंद्र शासनाने 2017 मध्ये सुरू केलेली पीएम मातृत्व वंदना योजना ही केंद्राची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील गरोदर महिलांना सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. वास्तविक ही योजना गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी आणि नवजात बालकाच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात आली आहे. आपला देश खरं पाहता विकसनशील देशाकडून वेगाने विकसित देशाच्या दिशेने आगे कूच करत आहे.
मात्र देशाला कुपोषणाची लागलेली कीड अद्याप पूर्णपणे नष्ट झालेली नाही. यामुळे शासनाकडून कुपोषणाला परास्त करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक रकमेतून संबंधित गरोदर महिलांना आपल्या आरोग्यावर आणि आहारावर खर्च करता येतो तसेच आपल्या बालकाच्या आरोग्यावर आणि आहारावर खर्च करता येतो.
हे पण वाचा :- ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; गारपिट पण होणार, भारतीय हवामान विभागाचा इशारा
योजनेचे स्वरूप थोडक्यात
पीएम मातृत्व वंदना योजना या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार रुपयाचा लाभ एकूण चार टप्प्यात मिळतो. पहिल्या टप्प्यात एक हजार, दुसऱ्या टप्प्यात 2000, तिसऱ्या टप्प्यात परत 2000 आणि चौथ्या टप्प्यात 1 हजार रुपये दिले जातात. चौथा टप्पा हा गरोदर महिलांच्या प्रसूतीनंतर दिला जातो. म्हणजेच या चौथ्या टप्प्यामुळे बाळाच्या आरोग्यावर आणि आहारावर संबंधित गरोदर मातेला खर्च करता येणार आहे.
कोणत्या महिलांना मिळतो लाभ
देशभरातील गरोदर महिलांना याचा लाभ मिळतो.
महाराष्ट्रात देखील ही योजना 2017 पासून अविरतपणे सुरू असून राज्यातील सर्वच गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्टे आहे.
मात्र असे असले तरी शासकीय सेवेवर रुजू असलेल्या गरोदर महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
किमान 19 वर्षे वयाच्या गरोदर महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
किती महिलांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड शहरातून समोर आलेल्या एका अधिकृत आकडेवारीनुसार 2017 पासून ते 2023 पर्यंत 54 हजार 587 गरोदर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही आकडेवारी देण्यात आली आहे.