स्पेशल

पुरुष असो किंवा स्त्री, 18 ते 50 वयोगटातील साऱ्यांनाच सरकारकडून 3 लाख रुपयांचे कर्ज मिळणार ! ‘या’ सरकारी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

Published by
Tejas B Shelar

Government Scheme : दहा वर्षांपूर्वी अर्थातच 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा पंतप्रधान पदावर आरूढ झालेत. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून आजवर नरेंद्र मोदी यांनी शेकडो योजनांची घोषणा केली आहे.

यातील बहुतांश योजना अजूनही सुरूच आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टर्म मध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना सुरु केल्या होत्या. आता तिसऱ्या टर्ममध्ये देखील मोदी सरकार अशाच मोठमोठ्या घोषणा करणार असे चित्र आहे.

गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये विविध क्षेत्रातील कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. दरम्यान आता याच योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 सप्टेंबर 2024 ला वर्धा येथे आयोजित एका कार्यक्रमातून किट वाटप केले जाणार आहे. या योजनेमुळे देशभरातील लाखो करोडो कारागिरांना फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण नेमकी पीएम विश्वकर्मा योजना आहे तरी काय, याचा कोणाला लाभ मिळू शकतो याबाबत आढावा घेणार आहोत.

कशी आहे पीएम विश्वकर्मा योजना?
पिढीजात चालणारे व्यवसाय पुढेही असेच चालू राहावे, पिढीजात चालणाऱ्या पारंपारिक व्यवसायांमध्ये आधुनिकीकरण व्हावे आणि पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचे आयुष्य सुधारावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना प्रशिक्षण दिले जात आहे.

भारतात शेकडो पिढीजात व्यवसाय केले जातात. या शेकडो पारंपारिक व्यवसायांपैकी काही व्यवसाय असे आहेत जे की नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही पारंपारिक व्यवसायांना आता मागणी राहिली नसल्याने अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. तसेच काही पारंपारिक व्यवसायांमधून अपेक्षित कमाई होत नसल्याने पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत.

याच गोष्टीची जाण ठेवून केंद्रातील सरकारने पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना स्किल ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण तर मिळतेच शिवाय व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे.

लोहार, मूर्तिकार, धोबी अशा 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे. देशभरातील जवळपास 30 लाख कारागिरांना या योजनेचा फायदा होणार आहे.

किती कर्ज मिळते?
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कमाल तीन लाख रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. जेव्हा हे कर्ज सदर कामगाराच्या माध्यमातून पूर्णपणे फेडले जाते तेव्हा या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज मिळते. म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दोन लाख असे एकूण तीन लाख रुपये पात्र कामगारांना दिले जातात. या कर्जासाठी ५ टक्के दराने व्याज आकारले जाते. तसेच स्किल डेव्लपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामसोबत ५०० रुपयांची स्टायपेंड सुद्धा दिली जाते.

योजनेच्या पात्रता काय आहेत?
या योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांनाच मिळणार आहे. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजे कोणत्याही राज्यातील नागरिकांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पण या योजनेचा लाभ फक्त 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

अर्ज कुठं करावा लागेल?
या योजनेसाठी सरकारने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे या योजनेसाठी नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच अर्ज करू शकता. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट चा उपयोग करून या योजनेसाठी अर्ज सादर करता येऊ शकतो. www.pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन इच्छुक आणि पात्र लोकांना आपला अर्ज सरकार दरबारी जमा करता येणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com