Gratuity Money Rule 2025 : निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात, यातीलच एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा लाभ म्हणजे ग्रॅच्युटीचा लाभ. निवृत्तीनंतर ग्रॅच्युटी मिळते पण ही ग्रॅच्युईटीची रक्कम नेमकी कशी मोजली जाते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ग्रॅच्युइटी मोजण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो ग्रॅच्युइटी म्हणजे पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कंपनीत केलेल्या कामासाठी दिले जाणारे बक्षीस. जर एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे काम करत असेल तर त्याला निवृत्तीनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर कंपनीकडून बक्षीस म्हणून एक ठराविक रक्कम दिली जाते आणि यालाच ग्रॅच्युइटी म्हणतात.
दरम्यान आता आपण एखाद्या कर्मचार्याने एखाद्या कंपनीत वीस वर्षे नोकरी केली असेल आणि त्याचा शेवटचा पगार हा 60 हजार रुपये असेल तर त्याला किती ग्रॅज्युटी मिळू शकते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेवटचा पगार 60000 असेल तर किती ग्रॅज्युएटी मिळणार?
सर्वप्रथम ग्रॅच्युइटी मोजण्याचा फॉर्मुला समजून घेऊयात. ग्रॅच्युईटीचा फॉर्मुला = ( शेवटचा पगार ) x (नोकरीचा कालावधी ) x (15/26). यात महिन्यातील रविवारचे ४ दिवस आठवड्याची सुट्टी म्हणून गणले जात नाहीत, त्यामुळे एका महिन्यात केवळ २६ दिवस मोजले जातात आणि १५ दिवसांच्या आधारे ग्रॅच्युइटीची गणना केली जाते.
आता आपण ज्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार 60 हजार रुपये असेल आणि ज्याने वीस वर्ष कंपनीत काम केले असेल त्याला किती ग्रॅच्यूटी मिळणार हे समजून घेऊया. (60000×20)×(15/26) = सहा लाख 92 हजार 307 रुपये.
कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळते ग्रॅच्यूटी
जर एखाद्या कंपनीत १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील तर अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते, यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही कंपन्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर दुकाने, कारखाने यांचाही यामध्ये समावेश केला जातो.
मंडळी, भारतात किमान ५ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूटी मिळते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्ष 8 महिने काम केले असेल तर ते पाच वर्षे मानले जाईल.
पण जर कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्ष 7 महिने काम केले असेल तर ते 4 वर्ष मानले जाईल. अशा परिस्थितीत कर्मचारी ग्रॅच्युइटी घेऊ शकत नाही. पण यामध्ये नोटिस पीरियड हा नोकरीचे दिवस म्हणून गणला जाणार आहे.